पाहा पुणेकर : दागिने, घर कमवले, पण तिला मुलांमध्ये संस्काराचा दागिना घडवता आला नाही, अखेर तुकडेच…

Pune Murder News : 30 ऑगस्ट रोजी मुलगा संदीप गायकवाड याला अटक करण्यात आली होती. तर 28 ऑगस्टला नातवाला अटक करण्यात आली होती. मुंढवा येथील केशव नगरमध्ये राहणारी ही महिला 5 ऑगस्टपासून बेपत्ता होती. अखेर तिच्या शरीराचे तुकडे आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

पाहा पुणेकर : दागिने, घर कमवले, पण तिला मुलांमध्ये संस्काराचा दागिना घडवता आला नाही, अखेर तुकडेच…
आजीच्या हत्येमागे नातू आणि मुलाचा हातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 9:33 AM

पुणे : पुण्यात (Pune Murder News) माणुसकीला काळीमा फासणारी घडना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानेच नातवाच्या मदतीने आईचा (Grandson killed grandmother) खून केलाय. पुण्यामधील मुंढवा (Mundhwa Crime) येथे घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. नातवाने आपल्याच आजीचे कटरने चक्क 9 तुकडे केले. याप्रकरणी मुलासह नातवालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कटरने 9 तुकडे केले

मृत महिला ही देहू रोड आर्मी कॅम्पमध्ये कामाला होती. आपल्या आईच्या दागिन्यांवर आणि तिच्या नावावर असलेल्या घरावर मुलगा आणि नातवाचा डोळा होता. त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आजी दुपारी झोपेत असताना नातवाने तिच्यावर धारदार कटरने वार करत तिची हत्या केली. आपल्याच आजीचे 9 तुकडे करणाऱ्या माथेफिरु नातवाला आणि मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पुणे पोलिसांकडून केला जातोय.

उषा गायकवाड (62) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तर अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव संदीप गायकवाड (42) असून नातवाचं नाव साहिल संदीप गायकवाड (20) आहे.

हे सुद्धा वाचा

30 ऑगस्ट रोजी मुलगा संदीप गायकवाड याला अटक करण्यात आली होती. तर 28 ऑगस्टला नातवाला अटक करण्यात आली होती. मुंढवा येथील केशव नगरमध्ये राहणारी ही महिला 5 ऑगस्टपासून बेपत्ता होती. अखेर तिच्या शरीराचे तुकडे आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

पोलीस काय म्हणाले?

मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी नातवाने आपल्या आजीची कटरने तुकडे करत हत्या केली. आजी झोपेमध्ये असताना नातवाने हे काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड केलं. झाडं कापण्याच्या इलेक्ट्रीक कटरने त्याने हे हत्याकांड रचलं. त्यानंतर शरीराचे तुकडे गोण्यांमध्ये टाकले आणि दुचाकी, कारच्या साहाय्याने ते घेऊन येत नदीत फेकून दिले. सोबत कटर आणि रक्ताने माखलेले कपडेही नदीत फेकण्यात आले होते.

खरंतर 10 ऑगस्ट रोजी नातवानेच आजीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी मुलानेही एका महिलेवर आईचं अपहरण केल्याचा आरोप करत तक्रार केली. मुलाने तक्रार दाखल केल्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी नातवाला अटक केली. त्यानंतर मुळामुठा नदीत शरिराचे तुकडे आढळून आले. थेऊर येथे शरिराचे तुकडे आढळल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीअंती मुलाच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.