Pune Murder : पुणे हादरलं! तंबाखू खायला पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून, कशी केली हत्या? वाचा

| Updated on: Nov 16, 2022 | 11:09 AM

पुणे जिल्ह्यात वाढलेल्या हत्येच्या घटनांनी चिंता! आता तर मुलगाच आईच्या जीवावर उठला

Pune Murder : पुणे हादरलं! तंबाखू खायला पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून, कशी केली हत्या? वाचा
धक्कादायक...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : तंबाखू खायला आईने पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने तिचा जीव (Pune Murder News) घेतला. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar, Pune) तालुक्यात घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केलीय. आईच्या डोक्यात खोरे घालून मुलाने आईचा खून केल्यानं परिसरात खळबळ माजलीय. आईच्या हत्येप्रकरणी (Son killed his own mother) अटक करण्यात आलेल्या मुलाचं वय अवघं 23 वर्ष आहे. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलाला बेड्या ठोकल्यात. याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

हत्या करण्यात आलेल्या आईचं नाव अंजनाबाईक बारकु खिल्लारी आहे. त्या 60 वर्षांच्या होत्या. डोक्यात गंभीर घाव घातला गेल्यानं त्यांचा जीव गेलाय. तर अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचं नाव अमोल बारकु खिल्लारी (वय 23) असं आहे. ही संतापजनक घटना जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे इथं घडली.

अंजनाबाई यांचा मुलगा अमोल याने आपल्या आईकडे तंबाखू विकत घेण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र अंजानाबाई यांनी मुलाला पैसे देण्यास नकार दिला. या गोष्टीचा अमोल यास राग आला. रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात फावड्याने घाव घातला आणि त्यात गंभीर जखमी झालेल्या अंजनाबाई यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

अंजानाबाई यांचे पती बारकु सखाराम खिलारी यांनी मुलाविरोधात फिर्याद दिली होती. पोलिसांनी फिर्यादीने केलेल्या आरोपांच्या आधारे मुलाला अटक केली आहे. सध्या मुलीचा कसून चौकशी केली जाते आहे.

आरोपी मुलाच्या पोलीस चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यताय. दरम्यान मुलाने आईची हत्या केल्यानं परिसरात खळबळ माजलीय. शिवाय मायलेकाच्या नात्यालाही काळीमा फासला गेलाय. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत हत्येच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढवली आहे. वाढत्या गुन्ह्यांना रोखण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर उभं ठाकलंय.