पुणे हादरलं! बिर्याणी हॉटेलच्या मॅनेजरची पाठलाग करत हत्या, हत्येचं कारण काय?

सिंहगड रोडवरील धायरी येथे खळबळजनक हत्याकांड! दुचाकीवरुन कोयता घेऊन येणारे ते हल्लेखोर कोण?

पुणे हादरलं! बिर्याणी हॉटेलच्या मॅनेजरची पाठलाग करत हत्या, हत्येचं कारण काय?
धायरीत तरुणाची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 1:38 PM

पुणे : सिंहगड रोड (Sinhgad Road) येथील धायरी (Dhayari Murder) मध्ये एका तरुणाची हत्या (Pune Murder) करण्यात आली. कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव भरत कदम असं आहे. 24 वर्षांचा भरत कदम हा तरुण पुण्यातील एका हॉटेलचा मॅनेजर होता. काम संपवून तो घरी जात होता. त्यावेळी वाटेत त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो ठार झाला.

भरत कदम हा पुण्यात गारवा बिर्याणी हॉटेलचा मॅनेजर म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री तो कामावरुन घरी जात असताना त्याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या भरत कदमच्या मृत्यूनं परिसरात दहशत पसरली आहे.

या हत्याकांड प्रकरणी सध्या सिंहगड पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. नेमकं या हत्येचं कारण काय आहे, आणि हत्या कुणी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही हत्या करण्यात आली.मृत भरत याच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर घाव कोयत्याने करण्यात आले होते.

तिघांनी बाईकवरुन येऊन भरतची हत्या केली असावी, अशी शंका पोलिसांना आहे. भरतचा तिघांनी आधी पाठलाग केला असावा आणि वाटेत संधी हेरुन मग, त्याच्यावर हल्ला चढवला असण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केलीय. या हत्येचं कारणही अद्याप स्पष्ट न झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. दरम्यान, आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून या हत्येचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सिंहगड रोड परिसरात घडलेल्या या हत्याकांडाच्या घटनेनंतर आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. वाढत्या हत्याकांडाच्या घटना चिंता वाढवत आहेत.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....