तिच्या मोहात फसला, हनीट्रॅपमध्ये अडकला, पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय, पुण्यात बड्या अधिकाऱ्याला बड्या

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने मोहात सोशल मीडियावर मैत्री केलेल्या एका तरुणीला देशाची अतिशय संवेदनशील माहिती दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्याने पाकिस्तानात असलेल्या तरुणीला ही माहिती दिल्याचा आरोप आहे.

तिच्या मोहात फसला, हनीट्रॅपमध्ये अडकला, पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा संशय, पुण्यात बड्या अधिकाऱ्याला बड्या
honey trap
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 11:23 PM

पुणे : पूर्वी युद्धात हनीट्रॅपचा वापर करुन संवेदनशील माहिती गोळा केली जायची. शत्रूचा पराभव करायचा असेल तर शत्रू राष्ट्रातील महत्त्वाची संवेदनशील माहिती आपल्याला माहीत हवी. यासाठी सौंदर्यवान महिलांचा वापर करुन हनीट्रॅप रचला जायचा. शत्रू राष्ट्राच्या सैन्य अधिकारी किंवा सैनिकांना मोहात अडकवून संवेदनशील माहिती मिळवली जायची. नंतर त्या माहितीच्या आधारे नियोजनपूर्वक हल्ला रचायचा. तशाच पद्धतीने आजही अनेक गुप्तचर यंत्रणा हनीट्रॅपच्या माध्यमातून इतर राष्ट्रातील संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण हनीट्रॅपमध्ये न फसणं हेच फायद्याचं ठरतं. पुण्यात देखील हनीट्रॅपचा एक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेत काम करणाऱ्या बड्या अधिकाऱ्याला दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती दिल्याचा अधिकाऱ्यावर आरोप आहे. संबंधित अधिकारी हा पुण्यातील DRDO या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून सेवेत होता. मात्र शासकीय कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्याने पाकिस्तानातील एका महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअॅप आणि व्हॉईस मेसेजद्वारे संपर्क ठेवल्याचा अधिकाऱ्यावर ठपका आहे.

अधिकाऱ्याला दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याने हनीट्रॅपमध्ये फसून पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोपआहे. संरक्षण संशोधन संस्थेच्या एक शास्त्रज्ञ पुणे येथील त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हचे (PIO) हस्तकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअॅपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिले असल्याची माहिती आहे. याच प्रकरणी एटीएसने कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

सहा महिन्यांपासून महिलेच्या संपर्कात

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्याने हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाक इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याचं स्पष्ट झालं आहे. निवृत्तीला सहा महिने बाकी असताना हा अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकला आहे. हा अधिकारी सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत संपर्कात होता, अशी माहिती आता समोर येत आहे.

हनीट्रॅप सारख्या गोष्टी हल्ली नेहमीच घडताना दिसतात. सध्या सोशल मीडियामुळे या घटना जास्त घडत आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे आजच्या घडीला मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध आहे. इंटरनेटवर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला जायला हवा. पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक इथेही सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर क्राईमचे गुन्हे सर्रासपणे केले जातात. अनेकांना लुबाडलं जातं. सायबर क्राईमच्या माध्यमातून ज्यांची फसवणूक होते त्यामध्ये वयस्कर वर्गाची संख्या जास्त आहे. त्यामुळे वारंवार अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नये असं आवाहन सातत्याने केलं जातं. पण तरीही अशा घटना घडतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.