Pune Rape : भयंकर! धावत्या रेल्वेत 14 वर्षांच्या अनाथ मुलीवर बलात्कार, पॅन्ट्रीमधील तिघा कर्मचाऱ्यांचं हैवानी कृत्य

Pune Rape News : भुसावळ रेल्वे स्थानकात एक अल्पवयीन अनाथ मुलगी आढळून आली होती.

Pune Rape : भयंकर! धावत्या रेल्वेत 14 वर्षांच्या अनाथ मुलीवर बलात्कार, पॅन्ट्रीमधील तिघा कर्मचाऱ्यांचं हैवानी कृत्य
संतापजनक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 12:20 PM

पुणे : 14 वर्षांच्या एका अनाथ मुलीवर धावत्या झेलम एक्स्प्रेसमध्ये (Jhelum Express Train) बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना धावत्या झेलम एक्स्प्रेस ट्रेनमध्ये असलेल्या पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांनी केली. याप्रकरणी तिघांना पुणे जीआरपीने अटक (Pune GRP News) केली आहे. पुणे जीआरपीने गुरुवारी तिघांना बलाल्ताकरप्रकरणी अटक करत त्यांची चौकशी सुरु केली. पॅन्ट्री कारमधील एका कर्मचााऱ्याने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Rape news) केला तर इतर दोघांनी त्याला साथ दिली असल्याचं समोर आलं आहे. 19 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 मिनिटांची बलात्काराची ही घटना घडली. भुसावळ रेल्वे पोलिसांनी या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. झेलम एक्स्प्रेसमध्ये ही संतापजनक घटना घडल्याचं उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडालीय.

कधीची घटना?

भोपाळहून झेलम एक्स्प्रेस ट्रेन पुण्याच्या दिशेने जात असताना 14 वर्षांच्या मुलीसोबत गाडीच्या पॅन्ट्रीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने हैवानी कृत्य केलं. ही बाब जेव्हा लक्षात आली, तेव्हा पीडितेला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं होतं. पीडितेची जेव्हा सामाजिक संस्थेनं चौकशी केली, त्यानंतर या हैवानी कृत्याबाबत पीडितेनं खुलासा केला. त्यानंतर एनजीओच्या मदतीने पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि अखेर तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

भुसावळ रेल्वे स्थानकात एक अल्पवयीन अनाथ मुलगी आढळून आली होती. या मुलीसोबत सामाजिक संस्थेच्या काही लोकांनी संवाद साधला. त्यानंतर पीडितेनं सांगितलेला घटनाक्रम ऐकून सगळेच हादरुन गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी  विनातिकीट झेलम एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होती. ती एका एसी कंम्पार्टमेन्टमध्ये असताना तिची पॅन्ट्रीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने चौकशी केली.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय केलं?

तुला टीसीकडे देईन, अशी भीती घालत कर्मचारी तिला पॅन्ट्री कारमध्ये घेऊन गेला. तिथे नेत त्यानं तिला जेवणं देतो, असं म्हणत भूलही लावली. यानंतर त्यानंतर तिच्यावर पॅन्ट्रीत हैवानी कृत्य केलं. त्यादरम्यान, तिथे इतर दोन कर्मचारीही होते. पण त्यांनीह त्याला रोखण्याचाही प्रयत्न केला नाही. यावेळी पीडित मुलगी विव्हळत होती. मदतीसाठी याचना करत होती. तडफडत होती. पण कुणीच तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. त्यानंतर तिला भुसावळ रेल्वे स्थानकात उतरवण्यात आलं.

यानंतर पीडितेनं दिलेल्या माहितीच्या आधारे हैवानी कृत्य करणाऱ्या आरोपांबाबत भुसावळ जीआरपीकडून पुणे जीआरपी पथकाला कळवण्यात आलं. या कर्मचाऱ्यांचा गणवेश, त्यांची चेहरापट्टी याच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर हे आरोप घोरपडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनीहा सगळा परिसर पिंजून काढत अखेर बलात्कार प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलंय. आता त्यांची चौकशी केली जातेय. पोलिसांकडून आता पुढील तपास केला जातोय.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.