Pune rape : अनिरुद्ध शेठ याने 50 वर्षीय महिलेवर सलग 3 वर्ष बलात्कार! व्हिडीओही शूट केला

तो पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट, ती त्याच्या ऑफिसात कामाला, एकत्र फ्लॅट बघायला गेले आणि पुढे जे घडलं त्याने..

Pune rape : अनिरुद्ध शेठ याने 50 वर्षीय महिलेवर सलग 3 वर्ष बलात्कार! व्हिडीओही शूट केला
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 10:18 AM

पुणे : पुणे जिल्ह्यातील एका 50 वर्षीय महिलेवर सलग 3 वर्ष बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी पेशाने सीए असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव अनिरुद्ध सतीश शेठ असं आहे. ही व्यक्ती कांचनगंगा होम्, डहाणूकर कॉलनी, कोथरुड येथे राहायला असून कोथरुड येथे त्याचं ऑफिसही आहे. ऑफिसात सोबत काम करणाऱ्या महिलेवरच अनिरुद्ध याने बलात्कार केल्याचा आरोप केलाय. सध्या कोथरुड पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

2019 ते 2022 या तीन वर्षांच्या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी 50 वर्षीय महिलेनं पोलिसांत तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी सीए अनिरुद्ध शेठ याला अटक केलीय.

मार्च 2019 मध्ये अनिरुद्ध शेठ यानं फिर्यादी महिलेला भुगाव इथं नेलं होतं. फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याच्याने पीडितेला अनिरुद्ध भुगाव येथील फ्लॅठवर गेला होता. त्यानंतर आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचं औषध देऊन फिर्यादी सोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवले होते. या घटनेचा व्हिडीओही त्याने रेकॉर्ड केला होता.

संपातजनक बाब म्हणजे सदर घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो व्हायरल करण्याची धमकीही त्याने पीडितेला दिली. त्यानंतर फिर्यादीसोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. मुंबई, पुणे आणि अलिबाग येथील हॉटेलात आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलीत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलंय.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध शेठ याने या महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत या विषयी कुणाला काही सांगितलं तर तुला आणि तुझ्या मुलला मारुन टाकेन, अशी धमकीही दिली. या प्रकारानंतर पीडित महिलेनं पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत आरोपीला अटक केली असून आता पुढील तपास केला जातोय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.