Pune Fire : पुणेकरांनो तुम्हीही स्कूल व्हॅनने मुलांना शाळेत पाठवता? कात्रजमध्ये स्कूल व्हॅन पेटली, थोडक्यात अनर्थ टळला
Pune School Van Fire : या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
पुणे : पुण्यात (Pune Fire News) गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढली आहे. दरम्यान, आता तर चक्क स्कूल व्हॅनच (School Van) पेटली. पुण्यात एका स्कूल व्हॅनने पेट घेतल्यानं रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता. ही घटना पुण्यातील कात्रज (Katraj) कोंढवा रोड भागातील यशवंत विहार मध्ये घडली. आगीमध्ये स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे ही स्कूल व्हॅन अचानक पेटली. यानंतर अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर अखेर ही आग आटोक्यात आली. या घटनेमुळे स्कूल व्हॅनच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातच नव्हे तर राज्यभरात वेगवेगळ्या शहरात स्कूल व्हॅनचा सर्रास वापर केला जातो. अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी स्कूल व्हॅनची मदत घेतात. अशावेळी स्कूल व्हॅनच पेटल्यामुळे आता पुण्यात पालक धास्तावले आहेत.
सुदैवानं मोठा अनर्थ टळला..
सकाळी साडेसातच्या सुमासात स्कूल व्हॅन पेटल्यानं चालकाचीही घाबरगुंडी उडाली होती. महत्त्वाचं म्हणजे यावेळी स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थी नव्हते. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान, स्कूल व्हॅनला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पाहा व्हिडीओ :
#Watch : पुण्यात स्कूल व्हॅन पेटली, पालकांनो तुम्हीही जर स्कूल व्हॅनने मुलांना शाळेत पाठवत असाल, तर आताच सावध व्हा, स्कूल व्हॅनच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्तानं ऐरणीवर आलाय. थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. #Pune #SchoolVan #fire pic.twitter.com/ynPCDGk1gk
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 20, 2022
मारुती सुझुकी ओमनीच्या स्कूल व्हॅनला लागलेल्या आगीमध्ये गाडीतील आतील भागाचं प्रचंड नुकसान झालंय. गाडीच्या सीटसह आतील सर्व भाग जळून राख झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
पाहा राज्यातील मोठी राजकीय बातमी
आता या घटनेमुळे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या गाड्या सुरक्षित कशा राहतील, याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जातेय. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.