दोघा मैत्रिणींच्या आत्महत्येनं पुणे हादरलं! वय अवघं 19 वर्षं, आत्महत्येचं कारण काय?

Pune Suicide News : सानिका भागवत हीने गळफास लावून आत्महत्या केली तर आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी टाकली आणि जीव दिला. सानिका हीने राहत्या घरातच गळफास लावून घेतल्यानं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. तर पाचव्या मजल्यावरुन उडी टाकल्यामुळे आकांक्षा हीचा जागीच मृत्यू झाला.

दोघा मैत्रिणींच्या आत्महत्येनं पुणे हादरलं! वय अवघं 19 वर्षं, आत्महत्येचं कारण काय?
मैत्रिणींच्या आत्महत्येनं पुण्यात खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 8:06 AM

पुणे : पुणे (Pune crime News) जिल्ह्यातील हडपसरमध्ये (Pune suicide news) दोघा मैत्रिणींनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. हडपसर पोलिस (Hadapsar Police) स्थानकाच्या हद्दीत ही घडना घडली. मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यापैकी एका मैत्रिणीनं गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं तर दुसऱ्या मैत्रिणीने थेट पाचव्या मजल्यावरुनच उडी टाकली.

वय 19, दोनमैत्रिणींची आत्महत्या

हडपसर जवळील शेवाळवाडी इथं दोन मैत्रिणीनी आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. आत्महत्या केलेल्या दोन्ही मैत्रिणींचं वय अवघं 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका मैत्रिणीचं नाव आकांक्षा औदुंबर गायकवाड आहे. तर दुसऱ्या मैत्रिणीचं नाव सानिका हरिश्चंद्र भागवत आहे.

कशी केली आत्महत्या?

सानिका भागवत हीने गळफास लावून आत्महत्या केली. तर आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी टाकली आणि जीव दिला. सानिका हीने राहत्या घरातच गळफास लावून घेतल्यानं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला.

हे सुद्धा वाचा

पाचव्या मजल्यावरुन उडी टाकल्यामुळे आकांक्षा हीचा जागीच मृत्यू झाला. आकांक्षाने पाचव्या मजल्यावरुन जेव्हा उडी टाकली, तेव्हा ती वरुन थेट एका रुग्णवाहिकेच्या जवळच कोसळली. पाचव्या मजल्यावरुन कोसळल्यामुळे आकांक्षाला मोठ्या प्रमाणात गंभीर जखम होऊन ती रक्तबंबाळ झाली होती.

LIVE Video : पाहा लाईव्ह घडामोडी

आत्महत्येचं कारण काय?

दोन्ही मैत्रिणींनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलंय. दरम्यान, हडपसर पोलिसांनी दोघींचेही मृतदेह ताब्यात घेतले आहे. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेत पाठवण्यात आले आहेत.  सध्या या आत्महत्याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

आकांक्षा आणि सानिका या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत. अजूनही या दोघींच्याही आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. या दोन्ही आत्महत्येचा छडा लावण्याचं आव्हान आता हडपसर पोलिसांच्या समोर उभं ठाकलंय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.