Pune News : सिंहगड रस्ता परिसरातील धायरीजवळील शेततळ्यात दोघांचा मुलांचा बुडून मृत्यू! तर जुन्नरमध्येही दोघे विद्यार्थी बुडाले

Pune Drowned : गेल्या 24 तासांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Pune News : सिंहगड रस्ता परिसरातील धायरीजवळील शेततळ्यात दोघांचा मुलांचा बुडून मृत्यू! तर जुन्नरमध्येही दोघे विद्यार्थी बुडाले
पाण्यात बुडून मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 8:33 AM

पुणे : पुण्यातील सिंहगड रोड (Sinhgad Road) परिसरातील धायरी इथं दोघांचा बुडून मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. 14 आणि 13 वर्ष वयाच्या दोन मुलांचे मृतदेह (Two young boys drowned) शेततळ्यात आढळून आले आहेत. यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या मुलांची ओळख पटली असून मृत मुलांचं नाव सुरज शर द सातपुते आणि पुष्कर गणेश दातखिंडे असं आहे. सुरजचं वय 14 वर्ष असून पुष्कर हा 13 वर्षांचा होता. सिंहगड रोडज परिसरात धायरी (Pune Accident News Dhayari) इथं खंडोबा मंदिराजल असणाऱ्या शेततळ्यात हे दोघेही जण बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पावसाळा सुरु झाल्यानं तलावात, नदीत जाऊन आनंद घेण्यासाठी अनेकजण जात असतात. मात्र यावेळी खबरदारी बाळण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. उत्साहाच्या भरात जीवावर बेतेल, अशी कृत्य टाळणं गरजेचं असल्याचंही मत व्यक्त केलं जातंय. अनेकदा शालेय मुलं पावसानंतर धरणात, नदीत किंवा तलावाच्या पाण्यात आंघोळीसाठी मौजमजेसाठी जात असतात. मात्र अशा वेळी मुलांना एकटं तलावाच्या, धबधब्याच्या किंवा नदीच्या ठिकाणी पाठवताना पालकांनीही काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जातेय.

जुन्नमध्येही दोन शालेय विद्यार्थी बुडाले

दरम्यान, इकडे जुन्नरमध्येही सोमतवाडी येथील पद्मावती तलावाजवळ फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या दोघा शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. पाय घसरून तलावात पडल्यामुळे ही दोनं पाण्यात कोसळली. खोल गाळात रुतले गेल्यानं या मुलांच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्यांची जीव गुदमरला. पवन दुर्देश ठाकूर आणि सम्राट परदेशी अशी दोघा मृत मुलांची नावं असून त्यांची वय अनुक्रमे 13 आणि 14 वर्ष होतं.

तलावाशेजारी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या हे दोघे जण फोटो काढत होते. त्यावेळी या पाय घसरुन ते दोघेही तलावाच्या पाण्यात पडले होते.

हे सुद्धा वाचा

या मुलांना स्थानिकांनी तलावातून बाहेर काढून डॉक्टरांकडे नेलं होतं. पण तिथं डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. मृत्यू झालेल्यापैकी पवन हा जयहिंद स्कूल कुरण इथं शिकत होता. तर सम्राट हा शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय इथं शिक्षण घेत होता. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच सिंहगड रोड येथील धायरी जवळही तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.