चैनीसाठी आलिशान गाडीतून बोकड चोरीचा हायटेक फार्म्युला, सांगली पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या

कोण कशाची चोरी, आणि कशासाठी कशातून होईल याचा काही नेम उरला नाही. सांगलीच्या इस्लामपूर इथल्या एका टोळीकडून केवळ चैनीसाठी आणि विशेष म्हणजे आलिशान गाडीतून या टोळीकडून बोकड-शेळ्या चोरण्याचा उद्योग करण्यात येत होता.

चैनीसाठी आलिशान गाडीतून बोकड चोरीचा हायटेक फार्म्युला, सांगली पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या
सांगलीत बोकड चोरांना अटक
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 7:14 PM

सांगली: इस्लामपूर येथे चैनीसाठी आलिशान गाडीतून बोकड चोरणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. कोण कशाची चोरी, आणि कशासाठी कशातून होईल याचा काही नेम उरला नाही. सांगलीच्या इस्लामपूर इथल्या एका टोळीकडून केवळ चैनीसाठी आणि विशेष म्हणजे आलिशान गाडीतून या टोळीकडून बोकड-शेळ्या चोरण्याचा उद्योग करण्यात येत होता. केवळ चैनीसाठी बोकड चोरी केल्याचे समोर आले आहे. सांगली पोलिसांनी या बोकड चोरी टोळीचा पर्दाफाश करत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. (Sangli Islampur Police arrested five persons for goat theft through four wheeler vehicles)

चैनी भागवण्यासाठी या शेळ्या-बोकडांची चोरी

एकीकडे मटणाचे दर गगनाला भिडले आहेत. सहाशे रुपये किलो दराने जवळपास मटणाची विक्री सुरू आहे.त्यामुळे बोकड-शेळ्यांना चांगली मागणी आहे.नेमकी हीच बाब ओळखून आपली चैनी भागवण्यासाठी या शेळ्या-बोकडांची चोरी करण्याची उद्योग सुरू होता.गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर परिसरामधील शेळी आणि बोकड चोरीच्या घटना सुरु होत्या.इस्लामपूर पोलीस यांच्याकडून कसून तपास पुरवताना तपासा दरम्यान नरसिंहपूर येथील एका टोळीकडून या शेळी आणि बोकड चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या टोळीच्या पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता शेळया आणि बोकड चोरी केल्याची कबुली दिली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख यांनी दिली.

पाच जणांना अटक

या प्रकरणी अजित पांडूरंग सुर्वे,वय 29, अजय रघुनाथ झीमुर, वय 29 अभिषेक कैलास गोतपागर,वय 30 धनंजय आनंदा कांबळे, वय 29 आणि किरण दिपक लोहार ,वय 29 या पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून तीन बोकड व एक शेळी आणि या शेळी चोरीसाठी वापरण्यात येणारी आलिशान गाडी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इस्लामपूर पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

मदतीऐवजी लोक मोबाईलवर व्हिडीओ काढण्यात मग्न, वृद्धाने पुराच्या पाण्यात जीव गमावला

बेकरीच्या आड ड्रग्जचा धंदा ! केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा

आधी प्रेमाचं नाटक, नंतर पॉर्न व्हिडीओ बनवत ब्लॅकमेलिंग, मिसेस राजस्थानचं घृणास्पद कृत्य

(Sangli Islampur Police arrested five persons for goat theft through four wheeler vehicles)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.