Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident : 4 मित्र निघाले, वाटेत कारची डिव्हायडरला धडक! 1 ठार, बचावलेले तिघे शॉकमध्ये

Shikrapur accident : अपघातग्रस्त कारमधील चौघेजण अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. या अपघातातून तिघे जण वाचले असले तरी त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Pune Accident : 4 मित्र निघाले, वाटेत कारची डिव्हायडरला धडक! 1 ठार, बचावलेले तिघे शॉकमध्ये
शिक्रापूरमध्ये अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 11:49 AM

पुणे : राज्यात अपघातांची (Maharashtra Accident News) मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये. पुण्यात झालेल्या भीषण कार अपघातामध्ये एकाचा मृत्यू (Pune Shikrapur accident) झाला आहेय. तर तिघे जण गंभीर जखमी झालेत. चौघे मित्र कारमधून निघाले होते. वाटेत त्यांची कार डिव्हायडरचा धडकली आणि अपघात झाला. या एका तरुणाचा उपचाराआधीच मृत्यू झाला. तर तिघा गंभीर जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातमध्ये डिव्हाडयरला कार धडकून थेट रस्त्याच्या शेजारी असलेल्या पत्र्यांवर आदळली. गुरुवारी हा अपघात घडला. पुण्यातील शिक्रापूर इथं हा अपघात घडला असून या अपघातग्रस्त कारमधील चौघेजण अहमदनगरहून पुण्याच्या (Ahmednagar to Pune) दिशेने निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. या अपघातातून तिघे जण वाचले असले तरी त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एकाचा उपचाराआधीच मृत्यू

अमोल फुले, वैभव कुंभारकर, अनिके चौखंडे आणि नितीन देशमुख हे चौघे मित्र कारने अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने यायला निघाले होते. मात्र वाटेत त्यांची एम एच 12 एम एफ 6664 या नंबरची कार डिव्हायडरला धडकली आणि या अपघातात अमोल फुले या 35 वर्षीय तरुणाचा जीव गेला. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याआधी त्याचा मृत्यू झाला होता. तर इतर 3 मित्र हे अपघातात गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर जखमींनी स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर सूर्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शिक्रापूर येथील पोलीस नाईक अंबादास थोरे यांनी या अपघातप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. या अपघातात तिघे जण सासवडचे राहणारे होते तर एक जण अहमदनगर येथील केडगावचा राहणारा होता.

हे सुद्धा वाचा

अपघातातली मृत – अमोल संभाजी फुले, वय 35, राहणार सासवड

अपघातातील जखमी

  • वैभव सुभाष कुंभारकर, वय 28 सासवड
  • अनिकेत उर्फ बाबू शरद चौखंडे, वय 23, सासवड
  • नितीन बबन देशमुख, वय 31, केडगाव, अहमदनगर
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.