सेल्फीचा नाद जीवावर बेतला, प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश

मयत शिक्षक पुण्याहून भोरमार्गे महाडला चालले होते. यावेळी वरंध घाटात सेल्फी घेताना खोल दरीत पडला. त्यानंतर पहाटे सुमारे तीन वाजता अंधारात आणि दाट झाडीझुडपातून हा मृतदेह दरीतून वर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं.

सेल्फीचा नाद जीवावर बेतला, प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश
सेल्फी घेताना शिक्षकाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 3:20 PM

पुणे : पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटात सेल्फी घेताना 600 फूट खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिक रेस्क्यू टीमला मध्यरात्री 3 वाजता यश आलंय. अब्दुल शेख असं या शिक्षकाचं नाव आहे. घाटात वाघजाई मंदिर परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावून माकडांना खायला देत सेल्फी घेत असताना संध्याकाळी सुमारे 5 वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला ही माहिती दिल्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात आलं होतं.

वरंध घाटात सेल्फी घेताना अपघात

मयत शिक्षक पुण्याहून भोरमार्गे महाडला चालले होते. यावेळी वरंध घाटात सेल्फी घेताना खोल दरीत पडला. त्यानंतर पहाटे सुमारे तीन वाजता अंधारात आणि दाट झाडीझुडपातून हा मृतदेह दरीतून वर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं. महाडची साळुंखे रेस्क्यू टीम आणि भोरच्या सह्याद्री सर्च रेस्क्यू टीमकडून हे शोधकार्य करण्यात येतं होतं.

मूळचे लातूरमधील रहिवासी आहेत मयत शिक्षक

या घटनेत मृत्यू झालेले अब्दुल कुदबुद्दीन शेख हे मूळचे लातूर जिल्ह्यातील एरंडी कोरंगळा येथील रहिवासी असून, ते सध्या त्यांच्या पत्नीसह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. तसेच ते रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस होते. तर त्यांची पत्नी वेल्हा तालुक्यातील करंजावणे येथे प्राथमिक शिक्षिका आहे.

हे सुद्धा वाचा

कारवरुन पोलिसांनी कुटुंबाची माहिती मिळवली

भोरहून वरंध घाट मार्गे मंडणगडला जात असताना रस्त्यात सेल्फी घेण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडला आसावा असा अंदाज स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वर्तवलाय. घटनास्थळी संबंधित व्यक्तीची लाल रंगाची कार आढळून आली.

त्यावरून पुढील तपास करत पोलिसांनी त्यांच्या घरच्यांचा शोध घेतला. भोर पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी उद्धव गायकवाड आणि विकास लगस पुढील तपास करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.