Pune Accident : मावळमध्ये अपघात, अनियंत्रित झाल्याने कार इंद्रायणी नदीत कोसळली
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, पुलावरून ही गाडी पाण्यात कोसळल्याचं दिसून आलंय. पुलावर तशा काही खुणाही नजरेस पडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बोरसे हे चाकणमधील एका कंपनीत कामाला होते. बोरसे चाकणहून इंदोरी गावाच्या दिशेनं चालले होते.
मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळमधील इंदोरी गावातील इंद्रायणी नदीत चारचाकी वाहन आणि त्यालगत एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पहाटेच हा अपघात (Accident) घडला असावा असा अंदाज तळेगाव एमआयडीसी पोलिसां (MIDC Police)नी व्यक्त केला आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला आहे. संजय बोरसे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नदीत गाडी आणि मृतदेह असल्याची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पुढील कारवाई केली. मृतदेह नदीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुढील कार्यवाही तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, पुलावरून ही गाडी पाण्यात कोसळल्याचं दिसून आलंय. पुलावर तशा काही खुणाही नजरेस पडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बोरसे हे चाकणमधील एका कंपनीत कामाला होते. बोरसे चाकणहून इंदोरी गावाच्या दिशेनं चालले होते. इंदोरी गावातून इंद्रायणी नदीच्या पुलावरुन जात असतानाच अचानक त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार नदीपात्रात कोसळली. कार नदीत कोसळल्यानंतर नदीत पाण्यात बुडून संजय बोरसे यांचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढला. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत. (The car crashed into the Indrayani river due to uncontrollable movement in Maval)