सोशल नेटवर्किंगवरील ओळख महागात पडली, अखेर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाची काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साइटवर एका अनोळखी तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर दोघांमधील संवाद वाढला.

सोशल नेटवर्किंगवरील ओळख महागात पडली, अखेर तरुणाने उचलले 'हे' पाऊल
सोशल मीडियावरील मैत्री तरुणाला महागात पडलीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 11:14 PM

अभिजीत पोते, TV9 मराठी, पुणे : सोशल मीडियावर तरुणीसोबत झालेली ओळख एका तरुणाला महागात पडले आहे. सोशल मीडियातील ओळखीमुळे तरुणाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. पुण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा आक्षेपार्ह व्हिडिओ (Offensive video) सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी (Threat to video upload on social media) देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने तरुणाने आत्महत्या (Youth Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे.

तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

मयत 25 वर्षीय तरुण पुण्यातील धनकवाडीत राहतो. तरुणीकडून वारंवरा होत असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून तरुणाने अखेर टोकाचा निर्णय घेत स्वतःचे जीवन संपवले. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साईटवर झाली ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाची काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साइटवर एका अनोळखी तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर दोघांमधील संवाद वाढला. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली.

हे सुद्धा वाचा

आक्षेपार्ह व्हिडिओ टाकण्याची धमकी देत पैशांची मागणी

पैसे न दिल्यास आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तिने तरुणाला दिली. त्यानंतर तरुणाने तिला ऑनलाइन पद्धतीने साडेचार हजार रुपये पाठविले होते. त्यानंतरही तरुणी त्याला धमकावत होती.

तरुणीला मॅसेज करत तरुणाची आत्महत्या

अखेर तरुणाने तिला संदेश पाठविला की, ‘मैं सुसाईड करा रहा हूँ’. त्यावर तिने ‘करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हिडिओ व्हायरल कर रही हूँ’, अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली.

तरुणीच्या धमकीमुळे तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली, अशी फिर्याद तरुणाच्या भावाने सहकारनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.