जुना वाद उफाळून आला, आरोपींनी तरुणासोबत केले असे काही…
नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवली. गणेश कदम याची हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. मात्र आता हा पूल एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पूर्ववैमनस्या (Animosity)तून भिडे पुलाजवळ एका तरुणाची हत्या (Murder) केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. गणेश कदम असे 35 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास करत आहे. गणेशची हत्या नेमकी कुणी आणि का केली ? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पुणे पोलीस याबाबत कसून तपास (Investigation) करत आहेत.
भिडे पुलाजवळ सापडला होता मृतदेह
पुण्यातील भिडे पुलाजवळ असलेल्या नदी पात्रात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला. मृत्यूची नोंद करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
जीवघेणा हल्ला करत तरुणाची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याची हत्या केली. नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवली. गणेश कदम याची हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु
आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांनी गणेश कदम याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.
गणेश कदम याची नेमकी कधी झाली याबाबत शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. गणेशबाबत त्याच्या नातेवाईकांचीही चौकशी सुरु आहे.