जुन्नर : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील एलआयसी (LIC) अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाची शाखा मध्यरात्री चोरांनी फोडली आहे. या सोबत स्टार हेल्थ विमा कंपनीचे ऑफिस व अजून एका खाजगी ऑफिससुद्धा चोरट्यां (Thief)नी फोडले आहे. गॅस कटरने दरवाजे तोडून चोरांनी आत प्रवेश केला. तसेच आपली ओळख लपवण्यासाठी चोरांनी चक्क cctv चा dvr चोरून नेला आहे. ऑफिसमधील तिजोरी (Vault) हलवण्याचा प्रयत्न झाला, ती तोडण्याचाही प्रयत्न झाला. मात्र ती तोडता आली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. आज रविवार असल्याने शाखेला सुट्टी होती त्यामुळे उशिरा ही घटना समजली.
नारायणगाव येथील एलआयसी शाखेसह स्टार हेल्थ विमा कंपनी आणि एका खाजगी ऑफिसमध्ये काल मध्यरात्री चोरटे घुसले होते. या चोरट्यांनी या ऑफिसमधील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने चोरट्यांना तिजोरी फोडताही आली नाही आणि तोडताही आली नाही. त्यामुळे सर्व मुद्देमाल सहीसलामत राहिला. मात्र ऑफिसमधील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते. यामुळे आपली ओळख लपवणयासाठी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेला.
अकोल्यातील जिल्हा रुग्णालयात मोबाईल आणि इतर वस्तू चोरून नेणारा चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रुग्णालयात रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक बाहेर निवांत झोपतात. रुग्णांच्या मदतीसाठी दिवसभर धावपळ केल्यानंतर नातेवाईकांना गाढ झोप लागते. जेव्हा रुग्णांचे नातेवाईक गाढ झोपेत असतात तेव्हा हा भुरटा चोर येऊन, त्यांच्या महागडा मोबाईलची सहज चोरी करतो. परंतु रुग्णांचे नातेवाईक झोपले असले तरी या चोराचे सर्व कृत्य सीसीटीव्हीने कैद केले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.