पुणे – बारामती तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाई देवी मंदिरातून देवीचे दागिने चोरी झाल्याची घटना धक्कादायक उघडकीस आली आहे. चोरी झालेल्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह 20 किलोचा पितळी सिंह, पितळी समया, स्पिकर मशीन, पंचारती धुपआरती व इतर सामान असा जवळपास तीन लाखांपर्यंत ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी पूजेच्या दरम्यान पुजाऱ्यांच्या लक्ष चोरीची घटना आली, त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या लक्षात आणून आली आहे.
असा झाला उलगडा
बारामती तालुक्यातील शिरसुफळ शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. आज पहाटे शिरसाई मंदिरात काकड आरतीसाठी गेले असताना चोरीच्या घटनेचा उलगडा झाला. मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे तोडून मंदिरात प्रवेश केला व दागिन्यांची चोरी केली.
चोरी झाल्याच्या निषेधार्थ बंद
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे चोरीचा तपास सुरु केला आहे. शिरसाई देवीच्या मंदिरात चोरी झाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ, सर्व लहान मोठे व्यवसायिक आणि व्यापारी यांनी गावत बंद पाळला आहे.असल्याची माहिती मंदिरातील पुजारी संजय गुरव, सरपंच आप्पासाहेब आटोळे व ग्रामस्थांनी दिली.
बारामती तालुक्यातील शिरसुफळ शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. असल्याची माहिती मंदिरातील पुजारी संजय गुरव, सरपंच आप्पासाहेब आटोळे व ग्रामस्थांनी दिली.
केरळच्या शाळेत सर आणि मॅडम बंद, विद्यार्थी यापुढं शिक्षकांना टीचर नावानं हाक मारणार, नेमकं कारण काय?
ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?