धनत्रयोदशीला दागिने पूजेला लावले अन् स्वयंपाकघरातील दरवाजा लावण्यास विसरले, मग…

| Updated on: Oct 25, 2022 | 10:36 PM

पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंबीय जेवून झोपी गेले. यावेळी घरचे स्वयंपाकघराचा दरवाजा लावण्यास विसरले. चोरट्यांनी नेमकी हिच संधी साधली.

धनत्रयोदशीला दागिने पूजेला लावले अन् स्वयंपाकघरातील दरवाजा लावण्यास विसरले, मग...
पुण्यात पूजेला लावलेले सोन्याचे दागिने चोरले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

पुणे : धनत्रयोदशीला पूजेला लावलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन (Gold Jewellery Stolen) नेल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कर्वे नगर (Karve Nagar Pune) परिसरात घडली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात (Waraje Police Station) चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. घरातील सर्वजण रात्री झोपल्यानंतर चोरटे स्वयंपाकघराच्या दरवाज्यातून आत घुसले. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले.

धनत्रयोदशीच्या पूजेला लावले होते दागिने

कर्वे नगर परिसरात एका बंगल्यात राहणारे गौरंग होनराव यांच्या घरी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली होती. धनत्रयोदशी दिवशी पूजेसाठी होनराव यांनी बँकेत ठेवलेले 8 लाख रुपये किंमतीचे दागिने घरी आणले होते.शनिवारी हे सर्व सोन्याचे दागिने त्यांनी देवघरात पूजेला लावले होते.

झोपताना स्वयंपाकघराचा दरवाजा लावण्यास विसरले

पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंबीय जेवून झोपी गेले. यावेळी घरचे स्वयंपाकघराचा दरवाजा लावण्यास विसरले. चोरट्यांनी नेमकी हिच संधी साधली. स्वयंपाकघराच्या दरवाज्यातून त्यांनी घरात प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा

सकाळी उठल्यानंतर चोरीची घटना उघड

घरात शिरुन देवघरात लावलेले 7 लाख 93 हजार रुपयांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. सकाळी घरातील मंडळी उठल्यानंतर देवघरात पाहिले असता चोरीची घटना उघडकीस आली.

याप्रकरणी गौरंग होनराव यांच्या फिर्यादीनुसार वारजे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात चोरीचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.