Pune crime| कौटुंबिक वादाला कंटाळल्याने पोलीस कर्मचाऱ्याने उचलले मोठे पाऊल…
अमोल माने हे येरवडा कारागृहात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्यांची गार्ड ड्युटी होती. पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील सरकारी रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. हा प्रकार समजताच सहकार्यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.
पुणे – शहरात कौटुंबिक कारणावरून वादविवाद होत असलेल्या घटना अनेकदा होत असतात. मात्र याच वादातून पोलीस शिपायाने (Police) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत जखमी कर्मचारी येरवडा कारागृहात (Yerawada Jail)कार्यरत आहेत. या घटनेने कारागृहात एकच खळबळ माजली. अमोल माने असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या पाेलिस शिपायाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी कौटुंबिक कारणावरुन हे कृत्य केले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात ( sasoon hospital) उपचार सुरू आहेत.
अशे घडली घटना
याबाबत मिळालेले माहिती जखमी अमोल माने हे येरवडा कारागृहात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्यांची गार्ड ड्युटी होती. पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील सरकारी रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. हा प्रकार समजताच सहकार्यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कारागृहातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र आत्महत्येच्या प्रयत्नाचे नेमका कारण काय याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
दुसरीकडं बारामती ऍग्रो कंपनीचे शेअर्स लवकर खरेदी करा असे आमिष दाखवत लोकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. रुपेश दत्तात्रय काळे असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बारामती ऍग्रो कंपनीचे जास्तीत जास्त शेअर्स खरेदी करा येत्या काळात ते खूप महागणार आहेत. अशी बतावणी करत शेअर्सचे खरेदी करायला लावली. या खरेदीसाठी मी मदत करतो असे सांगत अनेकांकडून पैसे घेत त्यांची फसवणूक केली आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इतिहास वाचून वक्तव्य करायला हवं होतं : उदयनराजे भोसले
Aurangabad | गुंठेवारी योजनेला 31 मार्चपर्यंतच मुदत! सहा महिन्यांत किती मालमत्तांचं नियमितीकरण?
Jhund: नागराज मंजुळेंची मराठीमोळी ‘झुंड’; फँड्री-सैराटमधल्या ‘या’ कलाकारांना पाहता येणार