Baramati Crime : बारामतीत पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, मित्राला करायला लावला पत्नीवर लैंगिक अत्याचार
शेखर माळशिकारे हा आपल्या मित्राच्या घरी जेवणासाठी गेला होता. त्यावेळी या दोघांनी दारु पिऊन जेवण केले. रात्री उशिरा संबंधित महिलेच्या पतीने आपल्या मित्राला या विवाहितेवर अत्याचार करायला लावलं.
बारामती : बारामती शहरातील तांदूळवाडी येथे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मद्यधुंद पतीने आपल्या मित्रालाच पत्नीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी संबंधित महिलेच्या पतीसह त्या मित्रावर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून, दोघा आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. शेखर माळशिकारे असे आरोपीचे नाव आहे. बारामती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मित्रासोबत जेवण केले मग पत्नीवर अत्याचार करायला सांगितले
शेखर माळशिकारे हा आपल्या मित्राच्या घरी जेवणासाठी गेला होता. त्यावेळी या दोघांनी दारु पिऊन जेवण केले. रात्री उशिरा संबंधित महिलेच्या पतीने आपल्या मित्राला या विवाहितेवर अत्याचार करायला लावलं. संबंधित विवाहितेनं विरोध केल्यानंतर त्या मित्रानं तिला मारहाण केली. या प्रकारानंतर संबंधित महिलेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. बारामती पोलिसांनी संबंधित पतीसह मित्र शेखर माळशिकारे याच्यावर गुन्हा दाखल केलाय. या दोघांनाही अटक करण्यात आलं असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
नागपूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
नोकरीचे आमिष दाखवून एका 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. एका हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्टचा जॉब आहे सांगून मुलाखतीसाठी घेऊन जातो असे सांगून तरुणीला भंडारा येथे नेले. तेथे एक दिवस तिला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला सोडून दिले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. (Two arrested along with her husband for abusing a woman in Baramati)