Pune Accident : पुणे नगर महामार्ग ठरतोय मृत्युचा सापळा, विचित्र अपघातात दोन ठार तर दोन जखमी

वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट डिझायर व दुचाकी अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याला वैद्यकीय मदत देण्यासाठी येणाऱ्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी चालक ठार झाला.

Pune Accident : पुणे नगर महामार्ग ठरतोय मृत्युचा सापळा, विचित्र अपघातात दोन ठार तर दोन जखमी
विचित्र अपघातात दोघांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 3:10 PM

शिरूर/पुणे : कोरेगाव भीमा येथे विचित्र अपघाताची घटना घडली आहे. येथील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट डिझायर व दुचाकी अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याला वैद्यकीय मदत देण्यासाठी येणाऱ्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी चालक ठार झाला. या अपघातात रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या शेजारील आणखी एक जखमी झाला आहे. कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन फाट्यावरील छञपती ऑटो गॅरेज समोर येथे हा अपघात घडला. महेश राजाराम गव्हाणे असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

स्विफ्ट डिझायर गाडीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक

महेश गव्हाणे हे आपल्या मोटारसायकलवरुन ताज असताना अहमदनगर बाजूकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. सदर कार लोहगाव येथील रहिवासी शंकरसन श्रीनरहरी राऊत यांच्या मालकीची आहे.

हे सुद्धा वाचा

रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुसरा अपघात

महेश गव्हाणे यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका येत होती. यावेळी सणसवाडी गावच्या हद्दीत कल्पेश वनज फाट्याजवळ रुग्णवाहिकेच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील श्रीकांत सुर्यकांत उबाळे या 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्ती दोघे जखमी झाले. वैभव गजानन डोईफोडे आणि अक्षय रविंद्र बनसोडे अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

शिक्रापूर पोलीस अपघाताची नोंद

याबाबत महेश गव्हाणे यांच्या अपघाताबाबत संतोष काळुराम गव्हाणे यांनी फिर्याद दिली असून, श्रीकांत उबाळे यांच्या अपघाताबाबत प्रशांत सूर्यकांत उबाळे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.