CCTV : रस्ता क्रॉस करताना तुम्हीही मागे पुढे करता? जराशी धाकधूक, अखेर कंटेनरने चिरडलंच
थरारक अपघाताचं सीसीटीव्ही समोर! कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार, अपघातात चूक नेमकी कुणाची?
सुनिल थिगळे, TV9 मराठी, पुणे : पुणे-नगर महामार्ग (Pune-Nagar Accident) मृत्यूचा सापळा बनतोय. रस्ता ओलांडत असताना एका पादचाऱ्याला मालवाहू कंटेनरचे (Road Accident) जबर धडक दिली. पादचाऱ्याला कंटेनरने धडक दिल्यानंतर अक्षरशः फटफटत नेलं. भरधाव कंटेनरचा जोरदार फटका बसून, कंटेनर अंगावरुन धडधडत गेल्यानं पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जीव गमावलेल्या पादचाऱ्याचं नाव कन्हैयालाल हस्तीमल फिरोदिया असं आहे. या भीषण अपघाताचा काळजाचा थरकाप उडवणार सीसीटीव्ही व्हिडीओही (Pune Accident CCTV) समोर आलाय.
शिरुर तालुक्यात सरदवाडी इथं ही थरकाप उडवणारी घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी अपघात झालेल्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी केलीय.
शिरूर तालुक्यातील सरदवाडी हद्दीत ट्रक नं एम.एच12 एच. डी 4278 या वरील अज्ञात चालकाला पादचारी रस्ता ओलांडत असल्याचं दिसून आलं नाही.
भरधाव वेगात पुणे नगर हायवे रोडने हा ट्रक घेवून जात असताना ट्रक चालकाने 78 वर्षीय फिरोदिया यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसंच हात, पाय आणि तोंडाला जबर मार बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पाहा नेमका कसा घडला अपघात?
बापरे! हा सिनेमातला सीन नाही, पुणे-नगर हायवेवर घडलेला डेंजर दुर्घटना आहे.. रस्ता क्रॉस करताना झालेल्या अपघातात नेमकी चूक कुणाची? #PuneAccident #AccidentCCTV (VC : सुनिल थिगळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी) pic.twitter.com/1ljKevYFCV
— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 14, 2022
सरदवाडी हे गाव पुणे नगर रस्त्यावरवरील भेळ या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेलं एक गाव आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गाव वसलेलंय. त्यामुळे सतत ग्रामस्थांना विविध कारणास्तव रस्त्यांच्या दोन्ही भागात ये-जा करावी लागते.
गावाच्या एका भागात विठ्ठल मंदिर आहे. सरदवाडी हे आध्यात्मिक क्षेत्र असलेले गाव असून कीर्तन, भजन आदी विविध धार्मिक कामाच्या निमित्ताने ग्रामस्थ विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी सतत ये-जा करत असतात.
अपघातानंतर लोकांमध्ये भीती
पुणे-नगर या राष्ट्रीय महामार्गाला सरदवाडी येथे तीव्र स्वरूपाचा उतार असल्याने पुण्यावरून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना रस्ता पार करणाऱ्या व्यक्ती दिसत नाही. शाळा, मंदिर, शेती अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सतत लोकांची ये-जा सुरु असते. अपघाताच्या या थरारक घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मुलांना, ग्रामस्थांना आपला जीव मुठीत धरून पुणे नगर हा राष्ट्रीय महामार्ग पार करावा लागतोय. त्यामुळे तातडीने गतिरोधक बसवावे, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे सदस्य तथा दलित स्वयंसेवक संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश सरोदे यांनी केलीय.