Pune crime| ‘कुठे गेलीये ती मुलगी, हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका; ट्विटरवर फोटो शेअर करत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी तरुणीला विवाहाचे आमीष दाखवलं. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच पीडित तरुण गरोदर राहिली. पीडित तरुणीनं जेव्हा आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा कुचिक यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले
पुणे – ‘हाचं तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक(Raghunath Kuchik) ज्याने एका तरुणीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपात ही करवला. न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत तीने काल FB पोस्ट केली अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाहीये. ती गायब आहे. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या सोबत असलेला रघुनाथ कुचिक याचा फोटो ट्विटरवर शेअर करत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी हल्लाबोल केला आहे. पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यापासून ती गायब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कुठे गेलीये ती मुलगी कि यानेच तिला गायब केली याचा ही तपास करा हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय आत्महत्येला प्रवृत्त करणार्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा. तिच्या मरणाची वाट बघू नका त्याआधी वाचवा तीला . यापूर्वीही चित्रा वाघ यांनी ट्विटर व्हिडिओ द्वारे पीडित तरुणीला मदत करण्याची विंनती केली आहे.
1️⃣ हाचं तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक….
ज्याने एका मुलीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपात ही करवला
न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत तीने काल FB पोस्ट केली अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाहीये..ती गायब आहे @AjitPawarSpeaks pic.twitter.com/WOD7BQ6QaJ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 14, 2022
त्याला जबाबदार कुचिकसह राज्य सरकार असेल
मी अत्यंत व्यथित होऊन हा व्हिडीओ करत आहे. शिवसेनेचा पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक ज्याला राज्यमंत्री पदाचा दर्जाही त्याला दिला आहे. अश्या हरामखोर , बलात्काऱ्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्तीने त्या मुलीचा गर्भपात केला. याबाबत त्या पीडित मुलीने समोर येऊन या सगळ्या गोष्टी संगीतल्या. एवढी गोष्टी, पुरावे असतानाही त्याला जामीन कसा काय मिळतो माहीत नाही. जामीनावर बाहेर असलेल्या या आरोपीकडून पीडितवर दबाव निर्माण केला जात आहे. ही केस मागे घे म्हणून मेसेजेस करतोय . हे मेसेजेस कुणाला दाखवायचे त्यांना दाखव मला काही फरक पडत नाही अशी धमकी ही त्या मुलाला दिली जातेय. त्याच्यामागे त्याचा कर्ताकरविता धनी कोण आहे. याबाबत पीडित मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली आहे. त्यात तिने लिहिले आहे ,की मी स्वतःला संपवत आहे. तिने जर तिच्या जीवाच काही बारवाईट केलं तर त्याची जबाबदारी कुचिकसह पुणे पोलीस प्रशासन व राज सरकाराची आहे.
तर तुम्हाला तिथे बसण्याचा अधिकार नाही
तिने केलेल्या सर्व पोस्ट मी पुणे पोलीस आयुक्त , राज्याचे गृहमंत्री यांना पाठवल्या , कित्येक फोन मी त्यांना केलं मात्र कुणीही फोन उचलला नाही. मला कळकळून सांगायचं आहे . वाचवा तिला. ती मेल्यानंतर आंदोलन करुन मोर्चे काढून, काळ्या फिती बांधून काही होणार नाही , मेणबत्या पेटवून काही होणार नाही, कुठे गेले सगळे. हाडामासाच्या जिवंत मुलीला न्याय देण्यात येत आहे. तर तुम्हाला तिथे बसण्याचा अधिकार नाही. पुणे पोलीस आयुक्त , जोंईन्ट सीपी कित्येक फोन मी तुम्हाला केले आहेत. तुमाच्या लेखी महाराष्ट्राच्या महिलांची इज्जतीची किंमत काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले आहे. मी पुन्हा विनंती करते की त कृपया त्या मुलीला वाचावा अशी विनंती चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर व्हडिओ पोस्ट केला आहे.
1️⃣ हाचं तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक….
ज्याने एका मुलीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपात ही करवला
न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत तीने काल FB पोस्ट केली अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाहीये..ती गायब आहे @AjitPawarSpeaks pic.twitter.com/WOD7BQ6QaJ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 14, 2022
काय आहे नेमकं प्रकरण?
शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी तरुणीला विवाहाचे आमीष दाखवलं. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच पीडित तरुण गरोदर राहिली. पीडित तरुणीनं जेव्हा आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा कुचिक यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले, असा आरोप करण्यात आलाय. इतकंच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगावे लागेत, असा इशाराही दिला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
आनंदवार्ता : 42 वर्षानंतर शेती पाण्याचा मार्ग मोकळा, कथा डोंगरगावच्या तलावाची..!