अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या मुलाला अटक, पुण्यात सायबर पोलिसांची मोठी कारवाई

भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी यांच्यासह दहा जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक झाली (Pune Cyber Rohan Mankani Data theft)

अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या मुलाला अटक, पुण्यात सायबर पोलिसांची मोठी कारवाई
अभिनेते रवींद्र मंकणी (डावीकडे) आणि पुत्र रोहन मंकणी
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 8:24 AM

पुणे : पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले. बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती (डेटा) चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी हाणून पाडला. यामध्ये अभिनेते रवींद्र मंकणी (Ravindra Mankani) यांचे सुपुत्र रोहन मंकणी (Rohan Mankani) यांचाही समावेश आहे. (Pune Cyber Cell arrests Actor Ravindra Mankani son Rohan Mankani in alleged Data theft Case)

डेटा खरेदीवेळी 25 लाख रुपये घेताना 10 जणांना अटक करण्यात आली. भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी यांच्यासह दहा जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक झाली आहे. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे. रवींद्र मंकणी यांच्या स्वामी, सौदामिनी, अवंतिका, शांती, बापमाणूस अशा मालिका गाजल्या आहेत. तर निवडुंग, स्मृतीचित्रे, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत.

कोण आहे रोहन मंकणी?

  • प्रसिद्ध चित्रपट-टीव्ही अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा
  • रोहन मंकणी हा भाजपच्या चित्रपट आघाडीचा पुणे शहराध्यक्ष
  • रोहन मंकणी अभिनय क्षेत्रातही सक्रिय
  • राजकीय विश्लेषक आणि सल्लागार अशी ट्विटरवर ओळख
  • फूड अँड वाईन इव्हेंट्सचे आयोजन करत असल्याचीही माहिती
  • 37 वर्षीय रोहन मंकणी पुण्यातील सहकारनगर भागात वास्तव्यास

खातेदारांचे सव्वा दोनशे कोटी वाचले

काही बॅंकांच्या देशभरातील खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन या माहितीची विक्री करण्याचा मोठा डाव पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. या डेटा चोरी आणि विक्री करण्याच्या प्रयत्नातून खातेदारांच्या खात्यातून जाणारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये पोलिसांमुळे वाचले. (Pune Cyber Cell arrests Actor Ravindra Mankani son Rohan Mankani in alleged Data theft Case)

25 लाख स्वीकारताना 10 जण अटकेत

या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी 25 लाख रुपये स्वीकारताना 10 जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौघांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघे जण नामांकित कंपन्यांमध्ये संगणक अभियंते म्हणून कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या :

फसवणूक प्रकरणात विक्रम गोखलेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन फेटाळला

(Pune Cyber Cell arrests Actor Ravindra Mankani son Rohan Mankani in alleged Data theft Case)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.