पुणे कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला, 28 वर्षीय आरोपीला यूएईमध्ये बेड्या

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरुन कॉसमॉस बॅंकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्‍ट्रॉनिक माहिती चोरली होती. (Pune Cosmos Bank Cyber attack)

पुणे कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला, 28 वर्षीय आरोपीला यूएईमध्ये बेड्या
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 9:25 AM

पुणे : पुण्यातील कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला (Cosmos Bank Cyber attack) प्रकरणी प्रमुख आरोपीला यूएई पोलिसांनी अटक केली. तब्बल 94 कोटी रुपये लुटणाऱ्या तिघा प्रमुख आरोपींपैकी एकाला यूएईमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. 28 वर्षीय आरोपी सुमेर शेख हा सध्या दुबईत राहतो. (Pune Cyber Crime Cosmos Bank Cyber attack Main Accuse arrested from UAE)

आरोपी सुमेर शेखच्या अटकेमुळे कॉसमॉस सायबर हल्ल्याच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास पुणे पोलिसांना मदत होणार आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून यूएई पोलिसांकडे पाठपुरावा केला जात आहे.

सायबर गुन्हेगारांनी 11 आणि 13 ऑगस्ट 2018 रोजी पुण्यातील कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर सायबर हल्ला केला होता. बनावट एटीएम कार्डद्वारे 94 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम काढून घेतल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरुन कॉसमॉस बॅंकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्‍ट्रॉनिक माहिती चोरली होती. या माहितीचा वापर करुन बनावट एटीएम कार्ड बनवले. ही कार्ड वापरात आणण्यासाठी आधी बॅंकेचा एटीएम स्वीच सर्व्हर हॅक करण्यात आला होता.

सायबर हल्ला केल्यानंतर तो पैसा घेण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी देश-परदेशात टोळ्या बनवल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून पैसे काढून घेतले. तर हॉंगकॉंगच्या हेनसेंग बॅंकेमध्ये आरोपींनी 11 ते 12 कोटी रुपये पाठवले होते. त्यापैकी सहा कोटी रुपये परत मिळवण्यात पुणे पोलिसांना यश आले. (Pune Cyber Crime Cosmos Bank Cyber attack Main Accuse arrested from UAE)

सुमेर शेखच्या नावे रेड कॉर्नर नोटीस

कॉसमॉस बॅंक सायबर हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी सुमेर शेख हा एक आहे. इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्याबाबत रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे 28 देशांच्या पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. यूएई पोलिसांना तपास करताना शेख जाळ्यात सापडला.

संबंधित बातम्या :

प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

PNB चा कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट! फसवणूक टाळायची असल्यास काळजी घ्या, अन्यथा…

(Pune Cyber Crime Cosmos Bank Cyber attack Main Accuse arrested from UAE)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.