शरद पवार, उध्दव ठाकरे, अजित पवारांचे फोटो मॉर्फ करुन बदनामी, पुण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल
शरद पवार, उध्दव ठाकरे, अजित पवारांचे फोटो मॉर्फ करुन बदनामी केल्याबद्दल पुण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. Pune Cyber Police register FIR against 13 person
पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोशल मीडियावर बदनामी करणं पुण्यातील तरुणांना महागात पडलं आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी पुणे पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात आकाश शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. (Pune Cyber Police register FIR against 13 person for circulating morphed images of Uddhav Thackeray Sharad Pawar Ajit Pawar)
सोशल मीडियावर नेत्यांची बदनामी करणं महागात पडलं
शरद पवार, उध्दव ठाकरे, अजित पवारांचे फोटो मॉर्फ करुन फेसबुक, व्हाटसअॅप आणि ट्विटर या सोशल साईटसवर बदनामी केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका कुणावर गुन्हा दाखल?
राजकीय नेत्यांची फोटो मॉर्फ करुन बदनामी केल्याप्रकरणी नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
तक्रार कुणी दिली?
आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भादवि कलम 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, नाशिकमध्ये पाच जणांविरोधात तक्रार
देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक येथील हॉस्पिटल पाहणी दौऱ्यात काही जणांनी वरच्या मजल्यावरुन एक व्हिडीओ शूट केला. “माजी मुख्यमंत्र्यांचं सोशल डिस्टन्सिंग बघा” अशा आशयाच्या कमेंट्स व्हिडीओ शूट करणारी आणि त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती करत होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या बिटको हॉस्पिटलमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना परिस्थिती बाबत आढावा घेतला होता. दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरही (Pravin Darekar) त्यांच्यासोबत होते. त्यावेळी काही जणांनी फडणवीसांविषयी आक्षेपार्ह भाषेत हेटाळणी केली होती.
महपौर म्हणतात आता तरी बोध घ्या, भाजप म्हणतं अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका, कोर्टाच्या कौतुकाने शिवसेना-भाजप आमनेसामनेhttps://t.co/Lr0DMvIKxn#CoronavirusIndia |#Mumbai |@mybmc |@KishoriPednekar | #LockdownMaharashtra | #OxygenEmergency
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2021
संबंधित बातम्या:
देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, नाशिकमध्ये पाच जणांविरोधात तक्रार
(Pune Cyber Police register FIR against 13 person for circulating morphed images of Uddhav Thackeray Sharad Pawar Ajit Pawar)