पुण्यात काय घडतंय? बाणेर-पाषाण लिंक रोडवर महिलेला मारहाण, Video तुफान व्हायरल

पुण्यात आता अवघड परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. एका महिलेवर दिवसाढवळ्या हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हल्ला कोणी का केला? याचा पोलीस तपास करत आहेत.

पुण्यात काय घडतंय? बाणेर-पाषाण लिंक रोडवर महिलेला मारहाण, Video तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 6:10 PM

पुणे  शहर गुन्हेगारीचा हॉटस्पॉट होत असताना दिसत आहे. दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. पुण्यामध्ये आजही एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर महिलेला ओव्हरटेक करत तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिला एक डिजिटल कंटेंट क्रिएटर असून हल्ला झाला त्यावेळी तिच्यासोबत दोन मुलेही होतीत. महिलेने या घटनेनंतर एक व्हिडीओ शुट करत आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे.

जेरीलन डिसिल्वा असं महिलेचं नाव आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर गाडीवरून आपल्या दोन मुलांसह चालल्या होत्या. त्यावेळी हल्ला करणाऱ्याने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डिसिल्वा यांनी त्याला जागा देत गाडी बाजूला घेतली. मात्र कार चालकाने गाडी थांबवली आणि डिसिल्वा यांच्या चेहऱ्यावर बुक्का मारला. यामुळे त्यांच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला.

हल्ला करणारा वृद्ध व्यक्ती असून तो वेगाने गाडी चालवत असल्याचं जेरीलन डिसिल्वा सांगितलं. महिलेने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला असून महिला आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. डिसिल्वा यांच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराने २ किलोमीटरपासून आपला पाठलाग केल्याचं महिलेने म्हटलं आहे.

दरम्यान,  हल्ला करणारा आरोपी कोण होता? त्याने जेरीलन डिसिल्वा यांच्यावर का हल्ला केला? पुणे पोली या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र अशा घटनांमुळे पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना काही धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भर दिवसा असे हल्ले होत असतील तर रात्रीच्या वेळी महिलांनी बाहेर पडावं की नाही असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.