पोटच्या पोरांची विष देत हत्या, मग प्रियकरासोबत जीव दिला! शिरुरच्या महिलेची अलिबागमध्ये आत्महत्या

Alibaug Crime News : 11 मे रोजी हे प्रियंका इंगळे आणि तिची दोन मुलं अलिबागच्या एका कॉटेजमध्ये राहत होते, असं सांगितलं जातंय

पोटच्या पोरांची विष देत हत्या, मग प्रियकरासोबत जीव दिला! शिरुरच्या महिलेची अलिबागमध्ये आत्महत्या
अलिबागमध्ये खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 10:29 AM

रायगड : अलिबागमध्ये (Alibaug Crime News) मंगळवारी खळबळजनक घटना उघडकीस आली होती. चौघांचे मृतदेह (four dead bodies) एका खोलीत आढळले होते. यामध्ये एक महिला, एक पुरुष आणि दोघा लहान मुलांचा समावेश होता. चौघा पर्यटकांचे मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ही हत्या होती, आत्महत्या (Suicide or Murder) होती की आणखी काही, यावरुन संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता याप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आईनं आपल्या तीन वर्षांच्या मुलाला आणि पाच वर्षांच्या मुलीला आधी विष देत त्यांची हत्या त्यांचा जीव घेतला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यानंतर आईनं आपल्या प्रियकरासोबत गळफास लावून घेत आत्महत्या केली असल्याची शक्यता असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केलीय. गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या महिला आणि पुरुषाचीविरोधात पोलिसांत खरंतर आधीच बेपत्ता असल्याची तक्रार याआधीच देण्यात आली होती. आता त्यांचे मृतदेह अलिबागमधील एका कॉटेजमध्ये आढलून आल्यानं खळबळ उडाली आहे.

25 वर्षांची महिला आणि 29 वर्षांचा या महिलेचा प्रियकर हे अलिबागमध्ये गेल्या काही दिवसांपासून राहत होते. हे दोघेही विवाहित होते. मात्र विवाहित महिला तिच्या विवाहीत असलेल्या प्रियकारसोबत अलिबागमध्ये राहायला का आली होती आणि तिने आपल्या मुलांनाही तिनं सोबत का आणलं होतं, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. गळफास घेतलेल्या अवस्थेत ज्या महिलेचा मृतदेह आढळलाय, ती मूळची पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील आहे.

घटना उघडकीस कशी आली?

11 मे पासून हे प्रियंका इंगळे आणि तिची दोन मुलं अलिबागच्या एका कॉटेजमध्ये राहत होते, असं सांगितलं जातंय. कुणाल गायकवाड हा प्रियंकाचा प्रियकरही त्यांच्यासोबत होता. कुणाल आणि प्रियंका 16 मे रोजी फिरुन आले. त्यानंतर त्यांनी राहत असलेल्या कॉटेजचा दरवाजा जो बंद केलं, तो पुन्हा उघडलाच नाही. जेव्हा दरवाडा उघडला, तेव्हा चौघांचाही जीव गेलेला असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर सगळेच हादरुन गेले.

हे सुद्धा वाचा

कोणतीच हालचाल दिसत नसल्यानं कॉटेजच्या मालकाला चिंता सतावू लागली होती. त्यासाठी कॉटेजचा मालक दुसऱ्या चावीनं दरवाजा उघडण्याासाठी गेला. दरवादा उघडल्यानंतर जे चित्र कॉटेजच्या मालकाला दिसलं, ते पाहून तो हादरुन गेला. यावेळी चौघाही जणांचे मृतदेह रुमध्ये पडले होते. कुणाल आणि प्रियंकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पडलेला होता. तरत दोन्ही मुलं बेडवर पडून होती. तीन र्षांचा माऊली इंगळे आणि भक्ती इंगळे असं मृत मुलांची नावं आहेत.

पा व्हिडीओ :

प्रियंकाच्या पतीनं ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. 2 मे रोजी प्रियंकाचे पती संदीप इंगळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली होती. तर मृत पुरुषाच्या कुणाल गायकवाडच्या पत्नीनंही पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

संदीप आणि कुणाल मित्र..

संदीप आणि कुणाल हे एकमेकांचे मित्र असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. संदीपच्या पत्नीचं त्याच्याच मित्रासोबत अफेअर असल्याचा संशय व्यक्त केला गेलाय. याप्रकरणी अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. पोलीस या संपूर्ण संशयास्पद प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.