Pune Firing : पुण्यातून मोठी बातमी समोर, गणपती विसर्जनादिवशी हवेत गोळीबार, कुठे घडलं?

Pune Firing News : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असताना गोळीबार झाला आहे. अज्ञातकडून हा गोळीबार करण्याता आल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.

Pune Firing : पुण्यातून मोठी बातमी समोर, गणपती विसर्जनादिवशी हवेत गोळीबार, कुठे घडलं?
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 9:44 PM

देशभरात गणपती बाप्पाला निरोप दिला जाता आहे. राज्यातील प्रमुख शहारांपैकी असलेलया पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. अशातच पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात पुन्हा गोळीबार झाला असून यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिक घाबरले. त्यासोबतच पोलिसांचीही धावपळ झाली.  पिंपरी चिंचवडमध्ये मुंबई- बंगळुरु हायवे लगत असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 8 वर अज्ञात व्यक्तीन हवेत गोळीबार केलाय.  हवेत गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पुण्यात गेल्या आठवड्यामध्य सलग ती दिवस गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाची मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात गणेशाचे विसर्जन केले जात आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले आहेत. त्यामुळे अशावेळी गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये 13 सप्टेंबरला काळेवाडीमधील नडेनगरमध्येही गोळीबाराची घटना घडली होती. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनोद नढे आणि त्यांचे भाऊ सचिन नढे यांना एक बारमध्ये गोळीबार केला होता. गोळीबारामागचे कारण समोर आले नव्हते पण त्यावेळी दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यासोबतच गुन्हेगारीसह महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही समोर येत आहेत. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.