Pune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार, एकाचा जागेवर मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
पुण्यातून सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना समोर आली आहे. उरूळी कांचन येखे शनिवारी इनामदार वस्तीजवळच्या गोळीबाराला 24 तास होण्याआधी आणखी एक गोळीबाराची घटना घडली आहे.
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. पुण्यात घेरा सिंहगड गावाच्या हद्दीत सांबरेवाडी येथ दोन गटामध्ये गोळीबाराची झाला आहे. खडकवासला धरणापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूरजवळच्या सांबरेवाडीमध्ये गोळीबाराची घटना घडली. शनिवारी रात्री 1 वाजता हा गोळीबार झाला. पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एकाच जागीच मृत्यू तर एक जण गंभीर झाला आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे.
खानापूरजवळ असलेल्या घेरा सिंहगडगावच्या हद्दीमधील सांबरेवाडीमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. शनिवारी रात्री एक वाजता दोन गटामध्ये गोळीबार झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही गटांमध्ये जुना काही वाद आहे. आधी एक गटाने गोळीबार केला त्यानंतर दुसऱ्या गटानेही गोळीबार केला असून आरोपी फरार आहेत. पोलीस फरार आरोपींच्या मागावर आहेत. गावातील वातावरण शांत राहण्यासाठी पोलिसांनी गावामध्ये बंदोबस्त तैनात केला आहे.
उरूळी कांचनमध्ये गोळीबार
पुण्यातील उरूळी कांचन येथे शनिवारी दुपारी बापू शितोळे याने पेशाच्या वादातून गोळीबार केला होता. बापू शितोळे याने तीन ते चार जणांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारामध्ये काळुराम गोते हे गंभीर जखमी झाले होते. या घटनांमुळे पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.