Kishor Marane Murder | शरद मोहोळनेही जानेवारीमध्येच किशोर मारणेला असाच संपवलेला, पुण्यातील प्रसिद्ध थिएटरजवळील रक्तपात

Sharad Mohol Kishor Marane Murder : पुण्यातील टोळीयुद्धाची सुरूवात 2005 पासूनच झाली होती. शरद मोहोळ हा दुसरा मोठा म्होरक्या होत्या. मारणे-मोहोळ टोळाने पुणे हादरून गेलं होतं, आता मारला गेलेला कुख्यात गुंड पिंट्या उर्फ शरद मारणे याची शरद मोहोळने भयानक हत्या केली होती.

Kishor Marane Murder | शरद मोहोळनेही जानेवारीमध्येच किशोर मारणेला असाच संपवलेला, पुण्यातील प्रसिद्ध थिएटरजवळील रक्तपात
Sharad Mohol Kishor Marane Murder
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 11:45 AM

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाली. 5 जानेवारी 2024 ला दुपारी दीड वाजता शरद मोहोळला त्याचाच साथीदार मुन्ना पोळेकर याने संपवलं. अवघ्या 20 वर्षाच्या पोराने त्याला चाहुलही लागून न देता सोबत राहून एक दिवस काटा काढला. मुन्ना पोळेकर याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने गोळ्या घालून मोहोळची हत्या केली. मोहोळ याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. मोहोळच्या हत्येमध्ये कोण-कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करत आहे. शरद मोहोळ याच्यावरही हत्या, हत्येचा प्रय्तन, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. मोहोळ टोळीचा मुख्य सुत्रधार (सँडी) संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ टोळीचा मुख्य म्होरक्या झाला होता. शरद मोहोळने आपल्या सख्या चुलत भावाच्या हत्येचा बदला अत्यंत क्रूर पद्धतीने घेतलेला. पुणे त्यावेळी हादरून गेलं होतं.

शरद मोहोळेने किशोर मोहोळला कसा संपवला?

मारणे आणि मोहोळ या दोन्ही टोळी आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी एकमेकांच्या टोळीतील लोकांना मारत होते.  मारणे टोळीतील अनिल मारणे आणि सुधाकर रसाळ यांना संदीप मोहोळच्या टोळीने संपवलं. याचा बदला म्हणून त्यांनी मारणे टोळीने संदीप मोहोळ याला पुण्यातील पौड फाटा येथील सिग्नलवर गोळ्या घालून मारलं. भावाच्या हत्येनंतर शरद मोहोळ याच्याकडे टोळीची सूत्र आली होती. गणेश मारणे सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडेसह मारणे टोळीने संदीप मोहोळ याला संपवलं. मात्र शरद मोहोळ याने आपल्या भावाच्या मर्डरचा बदला घेतलाच.

किशोर मारणेला कसा संपवला?

गणेश मारणे संदीप मोहोळ याला मारूण तुरूंगात गेला होता. त्यावेळी मारणे टोळीची सूत्र किशोर मारणेकडे आली होतीत. शरद मोहोळ याला एक गुप्त माहिती मिळाली. 11 जानेवारी 2010 ला किशोर मारणे ‘नटरंग’ हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी पुण्यातील निलायम टॉकीजमध्ये गेला होता. शरद मोहोळने आपल्या साथीदारांच्या मदतीने सापळा रचला. किशोर मारणे चित्रपट पाहून बाहेर आल्यावर चहा प्यायला शेजारील प्लॅटिनम हॉटेलमध्ये गेला. चहा पिऊन झाल्यावर दबा धरून बसलेल्या शरद मोहोळच्या साथीदारांनी त्याला गोळ्या घातल्या. इतकंच नाहीतर त्याच्यावर कोयत्याने तब्बल 40 वार केले होते. या हत्येनेही पुणे हादरून गेलं होतं.

शरद मोहोळ आणि अमित पाठक हत्या केल्यावर  ना. सी. फडके चौकाकडे पळत चालले होते. त्यावेळी रस्त्यात त्यांना एका महिला पोलीस हवालदाराने अडवलं. अमित पाठक याचं शर्ट रक्ताने माखलं होतं, महिला पोलीस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावू लागल्यावर त्यांनी  फोन हिसकावून घेत तो फोडला आणि तिथून पळ काढला.

दरम्यान, किशोर मारणे याच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्याव शरद हिरामण मोहोळ, अमित अनिल पाठक, दीपक गुलाब भातंमब्रेकर, दत्ता किसन गोळे, योगेश भाऊ गुरव, हेमंत पांडुरंग धाबेकर, मुन्ना ऊर्फ मुर्तझा दावल शेख यांना जन्मठेप सुनावली होती.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.