पुणे – पुणे जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील बनेश्वर वन उद्यानाच्या शेजारी असलेल्या शिवगंगा नदी (Shivganga River) आहे. शिवगंगा नदीत चंदन तस्करांनी पाण्यात चंदनाचे 15 ते 16 ओंडके लपवले होते. भोरच्या नसरापूर पोलिसांनी (Nasarapur Police) हे चंदनाचे ओंडके जप्त केले आहेत. या चंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंच्या घरात आहे. पुण्यातील सद्दाम शेख हे कुटुंबासह बनेश्वर या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी ते पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. काहीवेळाने पाण्यात त्यांच्या पायाला काहीतरी जड लागल्याचे जाणवले. यावेळी त्यांनी खोलवर बुडी मारून पाहिले असता लाकडी ओंडके त्यांना दिसले. त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. नसरापूरच्या राजगड पोलिसांकडून भोरचा पुष्पा कोण ? याचा सध्या शोध सुरू आहे.
सुपरस्टार अल्लू अर्जुनचा याच्या पुष्पा चित्रपटामुळे रक्तचंदन चांगलं चर्चेत आहे. त्या चित्रपटात चंदनाची तस्करी करून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते हे दाखवण्यात आले आहे. असाच प्रकार भोर तालुक्यात नसापूर येथील बनेश्वर वन उद्यानच्या पाठीमागे असलेल्या नदीपात्राच्या पाण्यात उघडकीस आला आहे. बनेश्वर वनउद्यानात असणाऱ्या शिवगंगा नदीच्या पाण्यात लपवलेले चंदनाचे 15-16 ओंडके एकाच ठिकाणी आढळून आले आहेत. यातील नेमका ‘पुष्पा’ कोण याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. वन विभागाने ताब्यात घेतलेल्या चंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत लाखो रूपये आहे. नदीच्या पात्रात अजून कुठे असा काय प्रकार आहे का ? याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाण्यात लपवून ठेवलेले चंदन कोणत्या भागात पोहचवण्यात येतं होतं याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.
पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार सद्दाम शब्बीर शेख हे कुटुंबासह पर्यटक म्हणून फिरण्यासाठी बनेश्वर उद्यानात आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास सद्दाम हे पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. काही वेळाने पाण्यात त्यांच्या पायाला काहीतरी जड लागल्याचे जाणवले. यावेळी त्यांनी खोलवर बुडी मारून पाहिले असता लाकडी सद्दाम शब्बीर शेख यांना ओंडके दिसले. ते बाहेर काढले असता चंदन असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतीत नसरापूरच्या राजगड पोलीसांना माहिती दिली. पोलीसांच्या समोर स्वतः सद्दाम यांनी सर्व चंदनाची ओंडके पाण्यातून बाहेर काढले. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.