Pune Crime : रस्त्यावर कोसळून ती तडफडत होती पण कोणीच.. पुण्यातल्या शुभदा कोदारे हत्येचा धक्कादायक Video समोर
कृष्णा कनोजा याने भररस्त्यात शुभदावर वार करून तिला जखमी केले, मात्र या हल्ल्यात शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यात तिचा मृत्यू झाला. आता या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
संपूर्ण पुणे शहराला हादरवणाऱ्या शुभदा कोदारे हत्याप्रकरणाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. कृष्णा कनोजा याने भररस्त्यात शुभदावर वार करून तिला जखमी केले, मात्र या हल्ल्यात शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यात तिचा मृत्यू झाला. आता या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हल्ल्यानंतर रस्त्यावर कोसळलेली शुभदा ही व्हिव्हळत होती, पण कोणीच तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही, लोकं फक्त तिथे बघ्याची भूमिका घेऊन पुढे उभे होते, तर तिच्यावर हल्ला करणारा आरोपी हा तिच्याच आजूबाजूला फेऱ्या मारताना या व्हिडीओत दिसला आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली होती. मात्र त्यावेळीच तेथील लोकांनी मदतीसाठी धाव घेत आरोपी कृष्णाला रोखलं असतं किंवा शुभदाची मदत केली असती तर तिचा जीव कदाचित वाचला असता, अशी भावना व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार मृत तरूणी शुभदा कोदारे आणि आरोपी कृष्णा एकाच कंपनीत काम करायचे. वडील आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असे सांगत शुभदाने अनेक वेळा कृष्णाकडून पैसे घेतले होते. कधी 25 दहजार तर कधी 50 हजार रुपये अशी रक्कम घेत तिने त्याच्याकडून सुमारे 4 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर तिने त्याच्याकडे पुन्हा पैसे मागितल्याने कृष्णाला तिचा संशय आला.
नक्की काय झालंय याची शहानिशा करण्यासाठी कृष्णाने थेट शुभदाचे मूळ गाव कराड गाठले. मात्र तिथे गेल्यावर जे समजलं ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शुभदाचे वडील अगदी ठणठणीत होते, आपल्याला काहीच झालं नसून कोणंतही ऑपरेशन झालं नाही, असं त्यांनी कृष्णाला सांगितलं. शुभदाने आपल्याला फसवून पैसे घेतले हे त्याला समजलं, त्यानंतर कृ्ष्णाने तिच्याकडे पैसे परत मागत तगादा लावला. याच मुद्यावरून त्यांचा अनेकदा वादही झाला.
WNS कंपनीच्या पार्किंग मध्ये 28- वर्षीय तरुणीवर वार करण्यात आले, त्या घटनेचे हे धक्कादायक फुटेज. तिथे उपस्थित असलेला एकही तिच्या मदतीसाठी धावला नाही.. दुर्दैव आहे..! #womensafety@PuneCityPolice @Dev_Fadnavis pic.twitter.com/DcG8CXeyOA
— Archana More-Patil (@Archana_Mirror) January 9, 2025
अद्दल घडवण्यासाठी वार केला पण
कृष्णाला शुभदाला मारायचे नव्हते पण अद्दल घडवायची होती. तिने आपल्याला फसवून पैसे घेतल्याचा राग त्याच्या मनात होता, त्याच रागातून त्याने 7 जानेवारी रोजी संध्याकाळी शुभदाला रस्त्यावर गाठलं आणि तिच्या हातावर वार केला. त्ायनतंर ती रस्त्यावर जखमी होऊन कोसळली, हातातून रक्तस्त्राव होत होता, पण कोणीची तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही.
तर कृष्णा हा तिथेच फेऱ्या मारत होता, नंतर त्याने हातातील शस्त्र खाली टाकलं, तेव्हाच लोकांनी धाव घेत त्याला पकडलं आणि चोपही दिला. मात्र त्यावेळीच तेथील लोकांनी मदतीसाठी धाव घेत आरोपी कृष्णाला रोखलं असतं किंवा शुभदाची मदत केली असती तर तिचा जीव कदाचित वाचला असता, अशी भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.