पायी चालणाऱ्या महिले जवळ गाडी नेतात, अन्… पुण्यातील घटनेनं पोलिसांचं टेन्शन वाढलं, घटना CCTV मध्ये कैद
पुण्यातील हडपसर येथे महिलेसोबत घडलेला प्रकार धक्कादायक असून महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे.
पुणे : गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नाही का? असा सवाल संतत्प नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामध्ये पुण्यातील हडपस येथील एक नुकताच सीसीटीव्ही समोर आल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर दिवसा पुण्यातील महादेव नगर परिसरात दिवसा ढवळ्या चैन चोरीची घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या दोघांनी पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले आहे. महिलेचा तक्रारीवरुन हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या आधारावर पोलिस अधिकचा तपास करत आहे. ईस्टर्न इलेगन्स सोसायटी समोरील घटना असून संशयित आरोपी फरार आहेत.
दिवसा ढवळ्या चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. खरंतर सोन साखळी चोरीच्या घटना नवीन नाहीत. मात्र, भर दिवसा घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ज्या रस्त्यावर वर्दळ कमी आहे अशा रस्त्यावर सोन साखळी चोर फिरत राहतात. महिला एकटी दिसल्याचे पाहून गाडी जवळ घेतात. आणि महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पळ काढतात. रस्त्यावर कुणीही नसल्याने आरडाओरड करूनही उपयोग होतांना दिसून येत नाही.
खरंतर हे संशयित आरोपी दुचाकी वरुन जात असतांना दुचाकी हळू करतात. महिलांच्या जवळ जातात त्यानंतर लागलीच गळ्यातील दागिने ओरबडले जात असल्याने पायी चालणेही सुरक्षित नसल्याची भावना महिला वर्गात निर्माण झाली आहे.
पुण्यातील महादेव नगर परिसरात दिवसा ढवळ्या चैन चोरीची घटना pic.twitter.com/tLhjs4qgbr
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) April 20, 2023
पोलिसांनी रात्रीचीच काय भर दिवसाही गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे. सीसीटीव्ही चा आधार घेऊ आता पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत असले तरी पोलिसांना कितपत यश येईल याची शास्वती नाही. त्यामुळे तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.