मित्रासोबत धरण परिसरात फिरायला गेली होती, पुन्हा घरी परतलीच नाही, तरुणीसोबत काय घडले?

सातारा जिल्ह्यातील 23 वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत भोरमधील भाटघर धरण परिसरात फिरायला गेली होती. मात्र तरुणी पुन्हा परतलीच नाही.

मित्रासोबत धरण परिसरात फिरायला गेली होती, पुन्हा घरी परतलीच नाही, तरुणीसोबत काय घडले?
धरणावर फिरायला गेलेली तरुणी पाण्यात बुडालीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 10:09 AM

पुणे / विनय जगताप : पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण परिसरात तरुणासोबत फिरायला जाणं तरुणीच्या जीवावर बेतलंय. भोरमधील नीरा नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या तरुणीचा अचानक तोल गेला आणि ती पाण्यात पडली. धरणातून पाणी सोडलेलं असल्यानं पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून गेली. तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी नीरा नदीत शोधकार्य सुरू आहे. हा अपघात की घातपात याबाबतही पोलीस शोध घेत आहेत. सदर तरुणी सातारा जिल्ह्यातीव खटाव तालुक्यातील असून, मित्रासोबत भाटघर धरण परिसरात फिरायला आली होती.

दोन दिवसांपासून तरुणीचा शोध सुरु

भोर येथील भाटघर जलाशयाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या वेळवंड आणि नीरा नदीच्या संगमाजवळ ही घटना घडली. खटाव (जि.सातारा) येथील तरूणी पाण्यात पडून बुडाली. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. परंतु मंगळवार सायंकाळपर्यंत तिचा मृतदेह सापडला नाही. अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. बुधवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

मित्राने पोलिसांना घटनेची माहिती दिली

सोमवारी धरणातून उन्हाळी आवर्तन पाणी सोडलेले असल्याने पाण्याच्या प्रवाहात ती वाहून गेली. तिच्यासोबत असलेल्या तरुणाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. संबंधित तरुणाने भोर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना खबर दिली. त्यावेळी भोर पोलीस घटनास्थळी संबंधित तरुणासोबत घटनास्थळी दाखल झाले.

भाटघर धरणाखालील घटनास्थळ हे सातारा जिल्ह्यातील शिरवळ (ता.खंडाळा) यांच्या हद्दीत येत असल्यामुळे भोर पोलिसांनी शिरवळ पोलिसांना कळवले. भोर पोलीस, शिरवळ पोलीस, भोरमधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान हे शिरवळ पोलिसांसमवेत संबंधीत तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.