दोन वर्षाचा सुखी संसार, लंडनमध्ये नोकरीची संधी, पण भावांमधील वाद सोडवायला गावी गेले अन्…

| Updated on: Apr 25, 2023 | 6:22 PM

स्वभावामुळे त्याची नोकरी टिकत नसे. मात्र भावामुळे आपली नोकरी गेल्याचे त्याला वाटत होते. यातूनच त्याच्या मनात तीव्र द्वेष भावना निर्माण झाली. या द्वेषाने अख्खे कुटुंबच उद्धवस्त झाले.

दोन वर्षाचा सुखी संसार, लंडनमध्ये नोकरीची संधी, पण भावांमधील वाद सोडवायला गावी गेले अन्...
कौटुंबिक वादातून सावत्र भावाकडून भाऊ आणि वहिनीवर हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

सुनील थिगळे, शिरुर : घरगुती वादातून सावत्र भावाने भाऊ आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात वहिनीचा जागीच मृत्यू झाला असून, भाऊ गंभीर जखमी आहे. जखमी भावावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे भाऊ आणि वहिनीवर हल्ला करत दुचाकीवरुन पळून जात असताना आरोपीचाही अपघात मृत्यू झाला आहे. पीडित जोडपे 1 मे रोजी लंडनला नोकरीसाठी जाणार होते. मात्र त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. प्रियांका बोंद्रे आणि सुनिल बोंद्रे अशी पीडित जोडप्याची नावे आहेत. दोघेही पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत होते. तर अनिल बोंद्रे आरोपी भावाचे नाव आहे. या प्रकरणी वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

प्रियंका आणि सुनील यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. दोघेही पुण्यातील आयटी कंपनीत सध्या नोकरीला होते, तर 1 मे रोजी दोघेही लंडनला नोकरीसाठी जाणार होते. तर आरोपी अनिल हा पुण्यातच एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. मात्र अनिलचा स्वभाव चांगला नसल्याने त्याची नोकरी फार काळ टिकत नसे.

भावामुळे नोकरी गेल्याचा आरोपीला संशय होता

गेल्या महिन्यातच अनिलची नोकरी पुन्हा गेली. यानंतर तो गावी गेला आणि आईवडिलांशी भांडण करु लागला. भावामुळे आपली नोकरी गेल्याचा आरोप तो करीत होता. यानंतर वडिलांनी सुनील आणि प्रियंकाला गावी बोलावून घेतले आणि वाद मिटवला. मग रात्री जेवण आटोपल्यानंतर सर्व जण झोपायला गेले. प्रियांका आणि सुनिल घराच्या छतावर, वडील घराच्या बाहेर आणि अनिल हा घरात झोपला होता. पहाटे अचानक छतावर ओरडण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून वडिलांनी छतावर जाऊन पाहिले असता अनिल भाऊ आणि वहिनीवर हल्ला करत होता.

हे सुद्धा वाचा

पळून जात असताना कारला धडक बसून आरोपीचाही मृत्यू

अनिलने भाऊ आणि वहिनीवर व्यायाम करण्याच्या लोंखडी डंबेल, चाकू आणि विटेने मारहाण केली. यात प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील गंभीर जकमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. भाऊ आणि वहिनीवर हल्ला केल्यानंतर अनिल आपल्या बाईकवरुन पळून जात असतानाच न्हावरे-चौफुला रस्त्यावर कारला जोरदार धडक दिली. त्यात तोही गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर ससून येथे उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास शिरूर पोलीस करीत आहेत.