Pune Crime : संशयाच्या भुताने पछाडलं, बायकोला सारखा फोन करतो म्हणून मित्रानेच मित्राला..
शयामुळे मित्रच मित्राच्या जीवावार उठल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मित्रानेच मित्राच्या पोटात बंदुकीची गोळी पायर करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सुनील थिगळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 25 नोव्हेंबर 2023 : संशयाचं भूत एकदा डोक्यावर चढलं की मग माणसाचं काही खरं नाही. जोपर्यंत संशय मनात पिंगा घालतो राहतो , तोपर्यंत माणूस सतत अस्वस्थ, बेचैन असतो. त्या भरात तो काय करेल सांगू शकत नाही. संशय मिटवण्यासाठी किंवा त्याच संशयातून, रागातून एखादं असं कृत्य घडू शकतं, ज्याचा नंतर आयुष्यभर पश्चाताप वाटू शकतो. संपूर्ण आयुष्यंच उद्ध्वस्त होऊ शकतं. याच संशयामुळे मित्रच मित्राच्या जीवावार उठल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मित्रानेच मित्राच्या पोटात बंदुकीची गोळी पायर करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
शुभम तांबे असे गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून त्याच्यावर यशवंत राव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजगुरूनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ माजली असून आरोपीला लवकरात लवकरप अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बायकोला सारखा फोन करतो म्हणून..
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या खेड तालुक्यातील चांदुस गावात ही घटना घडली. जखमी शुभम तांबे आणि आरोपी हे दोघे जुने मित्र आहेत. मात्र आरोपीच्या बायकोला शुभम फोन करायचा. त्याचा सारखा फोन येणे हे आरोपीला आवडत नव्हते. याच रागातून त्याने शुभमचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी आरोपीने शुभमला त्याच्या घरी बोलावले आणि तेथेच त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. आरोपीने बंदूक घेऊन शुभमच्या पोटात गोळी झाडली.
या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकन आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला पिपरी चिंचवड येथील यशवंत राव चव्हाण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. राजगुरुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
फिरायला जायला नकार देताच बायकोने नाक फोडलं, नवऱ्याचा जागीच मृत्यू
पुण्यातूनआणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाला फिरायला का नेलं नाही? या वादातून बायकोने नवऱ्याच्या नाका-तोंडावर ठोसे दिले. यामध्ये नवऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित घटना ही पुण्यातील वानवडी परिसरातील घडली आहे. पती-पत्नीमध्ये फिरायला जाण्यावरुन वाद झाला मात्र तो वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात पत्नीने पतीच्या नाकावर ठोसा दिला. यामुळे पतीचा मृत्यू झाला. वाढदिवसाला फिरायला का नेलं नाही? यावरून वाद झाला होता. या वादात पत्नीने आपल्या पतीला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.