Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : गणेश विसर्जनादरम्यान चिमुकल्यासोबत तो सेल्फी अखेरचा ठरला.. घरच्यांना कल्पनाही नव्हती असं काही घडेल !

अनंत चतुर्दशीनिमित्त काल राज्यभरात गणरायाचे विसर्जन पार पडले. भाविकांनी मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या दैवताला निरोप दिला. मात्र विसर्जनादरम्यान एक दु:खद घटना घडल्याने शहरावर शोककळा पसरली.

Pune News :  गणेश विसर्जनादरम्यान चिमुकल्यासोबत तो सेल्फी अखेरचा ठरला.. घरच्यांना कल्पनाही नव्हती असं काही घडेल !
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 5:12 PM

रणजित जाधव, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड | 29 सप्टेंबर 2023 : राज्यभरात काल अनंत चतुर्दशीचा उत्साह होता. विद्येची देवता असणाऱ्या लाडक्या गणरायाची १० दिवस पूजा-अर्चा केल्यानंतर काल मोठ्या उत्साहात विसर्जन (ganesh visarjan 2023) पार पडले. पुण्यातही काल विसर्जनाचा उत्साह पहायला मिळाला. गणरायाच्या नावाचा जयघोष करत, टाळ मृदुंग, लेझीम, ढोल-ताशा यांच्या गजरात भाविकांनी लाडक्या बाप्पाला साश्रूनयांनी निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंतीही या दैवताला केली.

राज्यभरात सह पुणे, पिंपरी चिंचवड येथेही हेच दृश्य दिसत होते. अनेक तासांची विसर्जन मिरवणूक पार पाडून सर्वजण घरी परतले. मात्र याच विसर्जन सोहळ्याला दु:खाची एक किनार आहे. या सोहळ्या दरम्यान एक दु:खद आणि अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले. गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीत पडल्याने ही दुर्घटना घडली.

तो सेल्फी अखेरचा ठरला

पिंपरी- चिंचवडमधील मोशी येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. तेथील मंत्रा सोसायटी येथे काल विसर्जनादरम्यान घडू नये ते घडले आणि सर्वच हादरले. मोशीतील मंत्रा सोसायटीमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.

सोसायटीतील गणपतीचे विसर्जन सुरू होते. घरच्यांसोबत उभा राहून अर्णव देखील विसर्जनाची मिरवणूक पहात होता. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाच होते. मात्र तेवढ्यात विसर्जन टाकीच्या शेजारी उभ्या असलेल्या चिमुकल्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. मिरवणुकीच्या आवाजामुळे कोणालाचा त्याची हाक ऐकू आली नाही. तो दिसत नसल्याचे बऱ्याच वेळानंतर घरच्यांचा लक्षात आले आणि शोधाशोध सुरू झाली. तेव्हा त्याचा मृतदेह टाकीत पडल्याचे आढळले. विसर्जनाला जाण्यापूर्वी अर्णवने सर्वांसोबत मोबाईलवर अनेक सेल्फी, फोटो काढले होते. त्याचा तोच फोटो अखेरचा ठरेल हे कोणाच्या ध्यानीही नव्हते.

लाडक्या लेकाच्या अकस्मात जाण्याने कुटुंबियांच्या दु:खाला पारावार उरला नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.