Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : आई, बहिणीवरील शिवीगाळ जिव्हारी लागली; दारू चढताच मित्राची… पिंपरी-चिंचवडमध्ये असं काय घडलं ?

दारूच्या नशेत मित्रांमध्ये भांडण झाल्याने अघटित घडलं. एक हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं. कुटुंबाला त्यांचा तरणाबांड मुलगा गमवावा लागला. संपूर्ण घरावर शोककळा पसरली.

Pune Crime :  आई, बहिणीवरील शिवीगाळ जिव्हारी लागली; दारू चढताच मित्राची... पिंपरी-चिंचवडमध्ये असं काय घडलं ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 9:09 AM

पिंपरी | 18 ऑक्टोबर 2023 : दारूचे सेवन (alcohol) भल्याभल्यांना संकटात पाडते. ती आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी तर वाईट असतेच पण त्यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो. दारू पिता पिता तिची नशा चढल्यानंतर अनेकांना शुद्ध रहात नाही. त्या नशेतच कोणी काही बरळतं, कधी वाद होतात, तर कधी भांडणं पेटून गुन्हाही घडू शकतो. मात्र ती नशा उतरल्यानंतर त्या व्यक्तीला समजतं की आपण काय करून बसलो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, हातातून वेळ निघून जाते आणि पश्चातापाशिवाय काहीच उतरत नाही.

दारूच्या नशेमुळे एक हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं. कुटुंबाला त्यांचा तरणाबांड मुलगा गमवावा लागला. संपूर्ण घरावर शोककळा पसरली. पिंपरी (pimpri) येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. जेथे मित्रानेच त्याच्या मित्रावर चाकूने वार करत त्याची हत्या (crime news) केल्याचे समोर आले. आणि त्यामागचं कारण काय, तर दारूच्या नशेत केलेली बडबड.. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली.

दारूच्या नशेत नको ते बोलला…

पिंपरी -चिंचवड येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. सूरज उर्फ जंजीर कांबळे असे मृत तरूणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सूरज हा त्याचे मित्र पंकज पाचपिंडे आणि अमरदीप उर्फ लखन जोगदंड यांना भेटला. ते तिघेही एकत्र दारू प्यायला बसले होते. बराच वेळ गप्पा मारत-मारत त्यांचे मद्यपान सुरू होते. मात्र थोड्या वेळाने त्यांना ते मद्य चढले. त्याच नशेत त्यांचं भांडण झालाय रागाच्या भरात मयत सूरज याने पंकज आणि अमरदीप या दोघांना शिवीगाळ केली. आई-बहिणीवरून शिवीगळा करत त्याने अपशब्दही वापरले.

याचा त्या दोघांना प्रचंड राग आला. संतापाच्या भरात पंकज आणि अमरदीपने सूरजच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सूरजचा जागीच मृत्यू झाला. नशा उतरल्यावर आपण काय करून बसलो, ते इतर दोघांना समजले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांच्या मित्राचा जीव आधीच गेला होता. हा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून पंकज आणि अमरदीपने सूरजचा मृतदेह कपड्यात गुंडाळला आणि बावधन येथील नाल्यात फेकून दिला. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. बीड येथील आंबेजोगाई या त्यांच्या मूळगावी जाऊन ते लपले.

सूरजच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर वाकड पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींनी शोधले आणि त्यांच्या मुसक्या आवळत अटक केली. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित तपास सुरू आहे.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....