जुना वाद टोकाला गेला, भररस्त्यात तरुणाचा काटा काढला !

जुन्या वादातून तरुणाने टोळक्याला खुन्नस दिली. यामुळे जुना वाद पुन्हा उफाळून आला. मग पाच दिवसांनी खुन्नसचा बदला घेण्यासाठी टोळक्याने भररस्त्यात केलेल्या भयंकर कृत्याने परिसरात खळबळ माजली.

जुना वाद टोकाला गेला, भररस्त्यात तरुणाचा काटा काढला !
पूर्ववैमनस्यातून तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 11:03 AM

खेड, पुणे / सुनील थिगळे : पूर्व वैमनस्यातून 22 वर्षीय तरुणाची सहा ते सात जणांनी जीवघेणा हल्ला करत हत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांदूस येथे घडली आहे. शुभम निवृत्ती काळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नावं आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये सहा ते सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुण आणि आरोपींमध्ये दोन वर्षापासून वाद सुरु होता. त्यातच पाच-सहा दिवसापूर्वी पीडित तरुणाने आरोपींना खुन्नसने पाहिले होते. यातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

रस्त्यातच बाईक अडवून तरुणावर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चांदूस येथील वाळुंज वस्ती येथून शुभम हा दुचाकीवरून चालला होता. यावेळी तेथे शुभमची दुचाकी अडवून त्याच्यावर या सहा ते सात जणांनी कोयत्याने वार केले. यामधे शुभम हा गंभीर जखमी झाला तर हल्ला करून या आरोपींनी घटनस्थळावरून पळ काढला. शुभमला काही नागरिकांनी रुग्णवाहिकेतून राजगुरूनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

खेड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा

शुभम काळे याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती गावात मिळताच गावातील अनेक तरुण, नागरिक यांनी रुग्णालयात धाव घेतली. यानंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र खेड पोलिसांनी जमावाला हटवून परिस्थिती आटोक्यात आणली. याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

संदीप अशोक कल्हाटकर, यशराज विजय वाघमारे, सूरज गोगावले, वैभव कोळेकर, शुभम उर्फ सोन्या चंद्रकांत कारले, करण कारले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या शोधात पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.