Pune Crime : तीन महिन्यांत तिसऱ्यांदा केला ATM उडवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी कसं केलं जेरबंद ?

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा युनिटच्या अधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे. या तीन आरोपींनी गेल्या तीन महिन्यांच्या काळात तीन वेळा एटीएम मशीन उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता

Pune Crime : तीन महिन्यांत तिसऱ्यांदा केला ATM उडवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी कसं केलं जेरबंद ?
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 1:17 PM

पुणे | 20 सप्टेंबर 2023 : विद्येचे माहरेघर अशी ओळख पुण्याची आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या शहरात गुन्हेगारीचं (crime cases) प्रमाण आणि तीव्रता प्रचंड वाढले आहे. रोज नवनव्या गुन्ह्यांच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. गुन्ह्याची अशीच एक धक्कादायक घटना पुण्यामध्ये (crime in pune) उघड झाली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा युनिटच्या अधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी गेल्या तीन महिन्यांच्या काळात तीन वेळा एटीएम मशीन उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ते तिघे तिसऱ्यांचा एटीएम उडवण्याचा प्रयत्न करता असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना अटक केली.

विशाल छबू पाल्हारे (वय 20), अनिकेत संजय शिंदे (वय 20) आणि आदित्य प्रदीप रोकडे (वय 20)अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी विशाल आणि अनिकेत हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून आदित्य हा पुण्यातील शिरूर येथे राहणारा असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिनही आरोपींनी पैसे मिळवण्यासाठी  पुणे- अहमदनगर हायवेवरील पारगाव येथील इंडिया वन कंपनीचे एटीएम मशीन उडवण्याचा प्रयत्न केला होता.

मे महिन्यात हे एटीएम उडवण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर यावत पोलिस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आली होती. स्फोटकांचा वापर केल्यानंतरही एटीएम उडवण्यात आरोपींना अपयश आले होते. त्यानंतर 6 जुलै आणि 26 जुलै रोजी आरोपींनी सेम पद्धत वापरून पुन्हा एटीएम उडवण्याचे दोन प्रयत्न केले खर पण त्यातही ते अपयशीच ठरले. यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात दोन वेगळ्या एफआयआर दाखल करण्यात आल्या.

वारंवार घडणाऱ्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा युनिटच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. त्यानंतर सीसीटीव्ही फूटे तपासले असता, त्या आधारे पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.