शरद मोहोळचा आरोपी मुन्नाला पकडण्यासाठी पोलिसांनी असा रचला सापळा, पत्रकार परिषदेत खुलासा
Sharad Mohol Accuse Trap : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांना पकडलं असून त्यांना नेमका कसा ट्रॅप लावला याबद्दल पत्रकार परिषदेत मोठा खुलासा झाला आहे.
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी 5 जानेवारी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद मोहोळ गेल्यावर अवघ्या आठ तासांमध्ये पोलिसांनी या गुन्ह्यातील आठ आरोपींना गजाआड केलं. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. प्रभारी सह आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सापळा कसा रचला याबद्दल सांगितलं.
असा रचला सापळा
शरद मोहोळ याची हत्या झाल्यावर पोलिसांनी प्रत्यक्षस्थळी जात पाहणी केली. तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याने गोळ्या मारल्याचं सांगतिलं. पोलिसांनी पथके तयार केलीत आणि मुन्ना पोळेकर याच्या मूळ गावी चौकशी केली. मात्र तो तिथे मिळाला नाही. गोळीबार करून ते दुचाकी घेऊन पळून गेले होते. त्या गाडीचा शोध घेतल्यावर ती बेवारस स्थितीत आढळली. जास्त माहिती घेतल्यावर पोळेकर याच्याकडे चार चाकी गाडी असल्याचं समजलं. त्यानंतर या गाडीचा नंबर ट्रेस केला. सर्व शहराच्या बाहेर जाणाऱ्या टोल नाक्यांवर शोध घेतला. यामधील शिवापूर टोल नाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं. शिरवळजवळ हे आरोपी दोन गाड्यांमध्ये आठ आरोपी सापडले.
शरद मोहोळची त्याच्या ऑफिसजवळच हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमध्ये मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे आणि यांचं पूर्वनस्य होतं. आमच्या टीमने आठ जणांना अटक केली त्यामध्ये दोन वकिलांचा समावेश होता. मुन्ना पोळेकर याने गेल्या तीन महिन्यांमागे पिस्टल आणल्याचं सांगितलं. रेकॉर्ड पाहिलं तर कानगुडे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी उशिरा आले आहेत त्यांची आता सर्व चौकशी केली जाईल.
मुख्य आरोपी पोळेकर आणि शरद मोहोळ यांचं घर दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे. मोहोळ जवळ जाणाऱ्या पोरांच्या संपर्कात मुन्ना आला आणि त्यांच्या मदतीने रेगुलर जायला लागला होता. मुख्य आरोपी पोळेकर याला मोहरा बनवत त्याचा मामा नामदेव कानगुडे याने मोहोळला संपवलं.
आरोपींची नावे
साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय 20, रा. सुतारदरा, कोथरुड), विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी), नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष घवाळकर (वय 20, रा. कोथरुड), रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड)