व्यावसायिक अग्रवाल यांच्या मुलाला अटक केली. मात्र त्याला थोड्याच वेळात जामीन मिळाला. तर त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार होते, अखेर पुणे पोलिसांनी त्यांना छ. संभाजीनगर येथून बेड्या ठोकत अटक केली. अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, गाडी चालवून दोघांना उडवल्याचे हे प्रकरण सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात गाजत असून अवघ्या काही तासांतच त्याला जामीन मिळाल्यानेही संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता त्या मुलाने एक मोठी कबुली दिली असून त्यामुळे त्याचे वडील गोत्यात सापडले आहेत.
अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यात्या वडिलांनीच त्याला पार्टीसाठी परवानगी दिली होती. ” मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही (licence) नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली. मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे”, असं पोलीस चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितल असून यामुळे एकच खळबळ माजली आहे.
शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. ते दोघेही राजस्थान येथील रहिवासी होते. या प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातापूर्वी पबमध्ये होता आरोप, सीसीटीव्ही फुटेज समोर
दरम्यान शनिवारी जेव्हा हा अपघात घडला त्याच्या काही काळ आधी तो अल्पवयीन आरोपी आणि त्याचे मित्र पुण्यातील प्रसिद्ध पबमध्ये गेले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुमारे ३० सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एका टेबलवर ४-५ लोक बसलेले दिसत आहेत. समोरच्या टेबलवर अनेक ग्लास, दारूच्या बाटल्या आणि इतरही अनेक ड्रिंक्स ठेवलेली दिसत आहेत. थोड्या वेळाने ती लोकं उठून बाहेर जातना दिसतात
२०० किमी वेगाने चालवत होता कार, अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर
कल्याणी नगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघाताचे फुटेजही समोर आले आहे. अपघात झाला तेव्हा अल्पवयीन आरोपी हा कार चालवत होता, हे फुटेजमधून स्पष्ट दिसतं. मर्यादित वेगापेक्षा त्याच्या कारचा स्पीडही खूप जास्त होता. तो २०० किमी वेगाने रस्त्यावरून ही कार चालवत होता. दरम्यान ज्या पोर्शे कारने त्या दुचाकीस्वारांना धडक बसली ती कार नोंदणीविनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आरटीओकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यामध्ये आणण्यात आली होती. पुण्यातील आरटीओ कार्यालयात या कारची नोंदणी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही
दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी – वड्डेटीवार यांची मागणी
दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पीत असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली ? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली ? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का ? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे, असा आरोप करण्यात येत आहे. आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला?
म्हणूनच सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अवघ्या १४ तासांत जामीन
दरम्यान दोघांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या अल्पवयीन आरोपीला काही तासांतच जामीन देण्यात आला. विशेष म्हणजे जामीन देताना न्यायालयाने त्याला जी शिक्षा दिली आहे, त्यामुळेही संताप व्यक्त होत आहे. आरोपीला शिक्षा काय तर अपघात या विषयावर ३०० शब्दांचा निबंध लिहा. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या मुलाला कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
१) आरोपीला 15 दिवस येरवडा विभागातील पोलिसांसोबत ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी मदत करावी लागेल. तसेच वाहतूक जागृतीचे फलक रंगवावे लागतील
२) आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतील.
३) भविष्यात आरोपीने कोणताही अपघात पाहिला तर त्याला सर्वप्रथम अपघात ग्रस्तांची मतद करावी लागेल. ४) रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरील उपाय या विष्यावर आरोपीला कमीत कमी 300 शब्दांचा निबंध लिहावा लागेल.
या अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.