पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून वेदांत अग्रवाल दोन जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय. शनिवारी मध्यरात्री त्याने त्याच्या आलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला उडवलं. या घटनेत निष्पाप तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. खरतर त्याने केलेला गुन्हा खूप मोठा आहे. बुधवारी बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला. त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. वेदांत अल्पवयीन आहे. त्याला प्रौढ ठरवून खटला चालवावा अशी मागणी होत आहे. कारण प्रौढ ठरवून खटला चालवल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा होऊ शकते. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यातील तरतुदींच्या आधारे काही लाभ मिळणार आहेत.
वेदांत अग्रवालचा बाल सुधारगृहात असा असणार दिनक्रम
– सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आवराआवर करून नाष्टा दिला जातो. नाष्ट्याला पोहे, उपीट, अंडी, दूध असतं.
– 11 वाजता प्रार्थना होते
– 11 ते 1 इंग्रजी आणि वेगवेगळ्या विषयाच्या शिकवण्या
– 1 ते 4 डॉर्मेटरीमध्ये आराम
– 4 वाजता पुन्हा नाष्टा
– 5 वाजेपर्यंत टीव्ही
– 5 ते 7 व्हॉलीबॅाल-फुटबॅाल खेळायला सुट्टी
– 7 नंतर जेवण
– 8 वाजता झोपण्यासाठी डॉर्मेटरीमध्ये रवानगी
जेवणासाठी सात्विक पौष्टिक आहाराचे मेन्यू. यात पालेभाज्या, चपाती, वरण भात असे वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू असतात.
वेदांतवर प्रौढ म्हणून खटला कधी चालणार?
कायद्यानुसार, आरोपी प्रौढ आहे का, हे सिद्ध करण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्या केल्यानंतर याबद्दलचा निर्णय घेतला जातो. त्या चाचण्या करण्यासाठी कोर्टाला काहीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे आजच प्रौढ म्हणून कोणताही निकाल देता येणार नाही, अशी भूमिका बाल हक्क न्यायालयाने घेतली आहे.