Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल अटकेत, क्राईम ब्रांचची कारवाई

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन केसप्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. या अपघातास जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवाल हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल अटकेत, क्राईम ब्रांचची कारवाई
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 9:39 AM

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन केसप्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. या अपघातास जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची आई आता पोलिसांच्या ताब्यात आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी अटक केली आहे.  ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवाल हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यामुळे अग्रवाल कुटुंबाभोवतीचा फास आवळला जात आहे.

संपूर्ण कुटुंब तुरूंगात

१९ मेच्या मध्यरात्री विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत कल्याणीनगर येथए एका बाईकला धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, मात्र त्याला अवघ्या काही तासांतच जामीन मिळाला. तसेच पोलिसस स्टेशनमध्येही त्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नागरिक संतापले, समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त झाला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर याप्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करताना पुणे पोलिसांनी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. शिवानी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आधीच कोठडीत आहेत. तर आता त्याची आईदेखील पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

ब्लड सॅम्पल बदलल्याचा आरोप

याप्रकरणी अटक केल्यानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताच नमुने तपासणीसाठी ससूनमध्ये देण्यात आले. मात्र तेथे त्याच ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा आरोप झाला आला. त्याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना, डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी पैसे घेऊन आरोपीच्या रक्त्याचे नमुने बदलल्याचे आरोप पोलिसांनी केला. याप्रकरणाची चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर या दोघांनीच ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचे समोर आले.

आरोपीचं रक्त बदलून एका महिलेचे रक्त देण्यात आल्याची चर्चा आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी शिवानी अग्रवाल हिला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते शिवानी अग्रवाल यांचं होतं का? त्यांनी कुणाला फोन करुन मुलाला वाचवण्यासाठी मदत मागितली, अपघाताचा ब्लेम कोणाला डोक्यावर घेण्यास सांगितलं, असे सगळे प्रश्न त्यांना चौकशीदरम्यान विचारण्यात येऊ शकतात.

अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाल्याचं उघड झाल्यावर शिवानी अग्रवाल काही काळ बेपत्ता झाल्या होत्या, मात्र अखेर आज पुणे पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान आज सकाळी 11.30 वाजता शिवानी अग्रवालच्या समोर पुणे पोलिस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.