Pune porsche accident : अग्रवाल फॅमिलीची मस्ती आता तरी उतरवली पाहिजे – अजय भोसले

ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला ते अजय भोसले हे शिवसेनेचे नेते असून २००९ साली ते थोडक्यात बचावले होते. आता अग्रवाल कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आल्यावर अजय भोसले यांची केसही पुन्हा उजेडात आली असून ''टीव्ही 9' च्या प्रतिनिधीने खास त्यांच्याशी बातचीत केली.

Pune porsche accident : अग्रवाल फॅमिलीची मस्ती आता तरी उतरवली पाहिजे - अजय भोसले
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 3:30 PM

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणामुळे रिअल इस्टेट व्यावसायिक अग्रवाल कुटुंब चर्चेत आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवून बाईकला धडक दिली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. यामुळे सध्या वातावरण तापलं असून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. एक नवा धक्कादायक खुलासा झाला असून अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचा त्यांच्या भावासोबत संपत्तीसंदर्भात वाद झाला होता. या वादात सुरेंद्र यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती. एवढंच नव्हे तर राजनच्या गुंडांनी गोळीबार केला.

ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला ते अजय भोसले हे शिवसेनेचे नेते असून २००९ साली ते थोडक्यात बचावले होते. आता अग्रवाल कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आल्यावर अजय भोसले यांची केसही पुन्हा उजेडात आली असून ”टीव्ही 9′ च्या प्रतिनिधीने खास त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी भोसले यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना अग्रवाल कुटुंबावर निशाणा साधला. अग्रवाल कुटुंबाची मस्ती आता उतरवली पाहिजे, कायद्याने कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

अजय भोसलेंवर गोळीबार का झाला ?

माझी आणि राम अग्रवाल यांची मैत्री होती. मात्र सुरेंद्र अग्रवाल आणि राम यांच्यात पैशांवरून वाद सुरू होते. त्या दरम्यान सुरेंद्रकुमार अग्रवाल हे बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटून आले. त्यांनी तिकडे जाऊन सुपारी दिली. माझा भाऊ काही मला पैसे देत नाही आणि अजय भोसले हा माझ्या भावाला मदत करत आहे.

छोट राजनचे फोन यायचे

तेव्हा मला अनेक वेळा छोटा राजनचे धमकीचे फोनो यायचे. त्यानंतर २००९ साली जेव्हा मी शिवसेनेच्या तिकीटवर विधानसभेची निवडणूक लढवली, तेव्हा एके दिवशी सकाळी १०.३० च्य सुमारास माझ्यावर गोळीबार झाला. मी जर्मन बेकरीडवळ असताना मला पहिली गोळी मारली, पण ती सुदैवाने मला लागली नाही, मिसफायर झाली.

त्यानंतर आम्ही त्या गुंडाचा पाठलाग केला. तेव्हा वेस्टईन हॉटेलजवळ पोहोचल्यावर त्यांच्यात आणि आमच्यात अवघ्या १५-२० फुटांचं अंतर होतं, ते गुंड बाईकवरून पळून जात होते. तेव्हा त्यांनी पुन्हा फायर केले, आणि ती दुसरी गोळी गाडीत बसलेल्या माझ्या मित्राच्या छातीत घुसली. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, असा थरारक अनुभव भोसले यांनी कथन केला. त्यावेळेस पोलिस केस झाली, तपासात एसकेंचा नाव समोर आलं. पण २००९ ते आत्तापर्यंत (२०२४) त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही.

त्यांची मस्ती उतरवली पाहिजे

अग्रवाल कुटुंबाला वाटतं की ते पैशाच्या जोरावर सगळं काही करू शकतात, पण या अपघातात ज्या दोन निष्पाप लोकांचा जीव गेला त्यांना तरी आता न्याया मिळाला पाहिजे. आता कायद्याने या अग्रवाल फॅमिलीच मस्ती उतरवली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भोसले यांनी केली. कोणालाही पाठिशी घालू नका, जे सत्य आहे ते बाहेर आणा आणि कठोरात कठोर कारवाई करा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

संपत्तीच्या वादातून छोटा राजनची घेतली मदत

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीचे आजोबा एसके अग्रवाल उर्फ ​​सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. एसके अग्रवाल यांचा भाऊ आरके अग्रवाल यांच्यासोबत काही मालमत्तेवरून वाद झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी सुरेंद्रने छोटा राजनशी हातमिळवणी केली होती. इतकंच नाही तर या संदर्भात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी बँकॉकला जाऊन छोटा राजनचा गुंड विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ ​​विजय तांबट याची भेट घेतल्याचा आरोप आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवरील सर्व खटले सीबीआयने एकत्र करून तपास केले आहेत. सर्व खटल्यांच्या सुनावणीसाठी मुंबईत विशेष ट्रायल कोर्ट नेमण्यात आले आहे. पुण्यातील या प्रकरणातही एसके अग्रवाल आणि राजन आणि इतरांविरुद्ध २०२१ पासून खटला सुरू आहे.

Non Stop LIVE Update
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.