Porsche Accident : पोर्श अपघात प्रकरणी विशाल, शिवानी अग्रवालला दिलासा नाहीच, जामीन अर्ज..

पुण्यातील पोर्श कार हिट अँड रन प्रकरण अजूनही चर्चेत आहे. भरधाव वेगाने कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलासह त्याचे आई-वडील,आजोबा तसेच रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर अशा अनेकांना याप्रकरणी अटक करण्यात होती.त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र कोर्टाकडून त्यांना दिलास मिळालाच नाही.

Porsche Accident : पोर्श अपघात प्रकरणी विशाल, शिवानी अग्रवालला दिलासा नाहीच, जामीन अर्ज..
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 6:17 PM

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्श कारन चालवता बाईकला धडक दिली, त्यामध्ये एक तरूण व एका तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला आता जवळपास चार महिने उलटून गेले असून अपघातास जबाबदार ठरलेला अल्पवयीन आरोपी हा बाल न्यायालयाने जामीन दिल्याने सध्या बाहेर आहे. मात्र त्याचे आई-वडील, शिवानी आणि विशाल अग्रवाल हे सध्या तुरूंगात आहेत. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळला. विशाल-शिवानी अग्रवाल यांच्यासह डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर, यासह २ आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र या 6 आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.

नेमकं काय घडलं ?

19 मे रोजी मध्यरात्री अल्पवयी मुलाने पबमध्ये जाऊन पार्टी केली, मद्यप्राशनही केले. त्यानंतर त्याने दारूच्या नशेतच पोर्श कार भरधाव वेगाने चालवली आणि एका बाईकला जोरदार धडक दिली. यामध्ये इंजिनिअर तरूण-तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या अपघाताची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घे, असा दबाव त्या दोघांनी त्यांच्या ड्रायव्हरवर टाकल, त्यासाठी त्याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले असा आरोपही त्यांच्यावर आहे. एवढंच नव्हे तर जबाब बदलण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांच्याकडून ड्रायव्हरवर दबाब आणण्यात आला. यापूर्वी पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली. सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी बोलावलं होतं.त्यानंतर अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. मात्र त्याचे आई-वडील अद्याप तुरूंगातच आहेत.

काय आहे पुणे कार अपघात प्रकरण ?

पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. ही महागडी गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता, असा दावा केला जातो. त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. त्याच्या रक्ताचेही नमुने बदलण्यात आले होते. याच कारणामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणात अनेक खुलासे झालेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.