Pune Porsche Accident : मुलाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला बनवलं बळीचा बकरा, अपहरणासाठी वापरलेल्या कारचा शोध सुरू

पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघाताचे तीव्र पडसाद उमटले असून आता याप्रकरणाची तीव्रता दिवसेंदिवस आणखीनच वाढत चालली आहे. या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा-बर्गर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच काही तासांतच त्याला जामीनही मिळाला होता. यामुळे लोकांमध्ये रोष प्रचंड वाढला होता.

Pune Porsche Accident : मुलाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला बनवलं बळीचा बकरा, अपहरणासाठी वापरलेल्या कारचा शोध सुरू
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 11:06 AM

पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघाताचे तीव्र पडसाद उमटले असून आता याप्रकरणाची तीव्रता दिवसेंदिवस आणखीनच वाढत चालली आहे. या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा-बर्गर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच काही तासांतच त्याला जामीनही मिळाला होता. यामुळे लोकांमध्ये रोष प्रचंड वाढला होता. दारूच्या नशेत भरधान वेगाने कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीची अखेर बालसुधारगृहात रवानगी झाली . तर त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबाही पोलिसांच्या ताब्यात आहेत. याप्रकरणी आता आणखी एक नवी, धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

आपल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र यांनी त्यांच्या ड्रायव्हरचा बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केल्याची धखळबळजनक माहिती समोर आली. अल्पवयीन आरोपी मुलाच्या कारचा चालक घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याचे अपहरण केले होते, त्यासाठी त्यांनी बीएमडब्ल्यूकारचा वापर केला होता. आता हे प्रकरण सध्या गुन्हे शाखेच्या हातात आलं असून ते या कारचा सध्या शोध घेत आहेत.

ड्रायव्हरला बक्षिसाचे दाखवले आमिष

विशाल अग्रवाल यांच्या अल्पवीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवून बाईकला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही धडक एवढी भीषण होती की बाईकवरून पडलेल्या मुलीचा तत्काळ जीव गेला तर दुसऱ्या जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर एकच संताप पसरला. मात्र आपल्या मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला. अपघात झाला तेव्हा माझा मुलगा नव्हे तर ड्रायव्हर कार चालवत होता, असा दावा त्यांनी केला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मोठ्या बक्षीसाचे आमिष दाखवले आणि गाडी मीच चालवत होतो, असे पोलिसांना सांगायला सांगितले. त्यानंतर कारचा चालक घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याचे अपहरण केले होते, यासाठी त्यांनी बीएमडब्ल्यू या कारचा वापर केला. ती त्यांच्या मित्राची कार असल्याचे समजते. सध्या ही कार बेपत्ता असून गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास हाती घेतल्यापासून ते कारचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान पोलिसांनी विशाल अग्रवाल याच्यावर चालकाचे अपहरण करणे, त्यावा डांबून ठेवणे, दमदाटी करणे आणि पैशांचे आमिष दाखवून पुराव्यात छेडछाड करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. आज त्याला कोर्टात हजर करणार असून त्याची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पोलिस कोठडी मिळाल्यास विशाल तसेच सुरेंद्र अग्रवाल याची एकत्र चौकशी करण्यात येणार आहे. या दोघांविरोधात ड्रायव्हरच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी नातू, वडील आणि आजोबा तिघेही आता अडकले असून अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांना 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. त्यांच्यावरही अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर कलम 365 आणि 368 कलम लावण्यात आले आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांनी दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर ड्रायव्हरने जबाब बदलावा यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांनीच दबाब आणला होता, असा आरोपही आह. यापूर्वी पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली. सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे वृत्त समोर आले होते. अजय भोसले यांची सुपारी दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.