धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग, चालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी महिलेने रिक्षातून उडी घेतली, मग…

पोलिसांनी आरोपीच्या विरोधात अपहरण, बलात्काराचा प्रयत्न, लैंगिक छळ आणि महिलेचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल केले आहेत.

धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग, चालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी महिलेने रिक्षातून उडी घेतली, मग...
गोव्यातून बाईक चोरुन कोल्हापुरात विकणाऱ्या दुकलीला अटक
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 11:24 AM

पुणे : पुण्यातील (PUNE) सासवडमध्ये (SASWAD) धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री साडेतीनच्या सुमारास एका महिलेचा उबेर रिक्षा चालकाने विनयभंग केला. त्यानंतर महिलेवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला केला असल्याची तक्रार महिलेने पोलिस स्टेशनमध्ये (PUNE POLICE) दाखल केली आहे. ती महिला आयटी कंपनीत (IT) नोकरी करीत आहे. ती महिला हांडेवाडी येथील घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरात अॅग्रीगेटर ऑटोरिक्षांच्या सेवेला परवानगी नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. सीसीटिव्ही तपासण्यासाठी एक पथक तयार सुध्दा करण्यात आलं आहे.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, महिलेसोबत रिक्षा चालक चुकीचं वागत असल्याचं लक्षात आल्यानंतर, त्या महिलेने चालत्या रिक्षातून उडी मारली. महिलेच्या पतीने जीपीएस ट्रॅकिंगचा वापर करुन संबंधित घटनास्थळ गाठलं. त्यानंतर त्या रिक्षाचा पाठलाग केला. धावती रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर पलटी झाली. त्यानंतर रिक्षा चालकाचा ताब्यात घेतले. त्या रिक्षा चालकाचे नाव अनिकेत नानासाहेब मुंजाळ (२४, रा. फुरसुंगी) असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी आरोपीच्या विरोधात अपहरण, बलात्काराचा प्रयत्न, लैंगिक छळ आणि महिलेचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल केले आहेत. काल आरोपीला कोर्टात सादर केले होते. न्यायालयाने आरोपीला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

महिलेने तक्रारीत काय लिहिलं आहे

ज्यावेळी महिला ऑफिसमधून बाहेर पडली, त्यावेळी तिला बाहेर रिक्षा दिसली. रिक्षात बसल्यानंतर त्या चालकाने रस्ता बदलला. त्यानंतर काळेपडळ भागात एका निर्जनस्थळी रिक्षा थांबवली. त्यानंतर रिक्षा चालक त्या महिलेच्या शेजारी बसला. त्या महिलेचं तोंड दाबलं, तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या महिलेने प्रतिकार केला. त्यावेळी घाबरलेल्या रिक्षा चालकाने माफी मागितली आणि घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. तोपर्यंत त्या महिलेने आपल्या पतीला झालेला सगळा प्रकार सांगितला. त्याबरोबर मदतीसाठी रेल्वेच्या गेटजवळ चालत्या वाहनातून उडी मारली.

त्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाईट ड्रॉपची सुविधा आहे. परंतु त्या महिलेने तशी कसलीही सुचना दिली नसल्यामुळे त्या गोष्टीचा लाभ घेता आला नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.