पुण्यातील भोर तालुका हादरला! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, मुलीची आई कपडे धुत असताना…

बदलापूरमधील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आणखीन तशा घटना समोर येत आहे. भोर तालुक्यातही एका अडीच वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

पुण्यातील भोर तालुका हादरला! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, मुलीची आई कपडे धुत असताना...
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 6:58 PM

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतान आता भोर तालुक्यात चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घडली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनं हद्दीतील एका गावात अडीच वर्ष वय असलेल्या बालिकेवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केला आहे. या अत्याचार प्रकरणातील पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून संबंधित नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे. राजगड पोलीस ठाण्यात याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे हद्दीत पुणे – सातारा महामार्गावरील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.17) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच राजगड पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. यावेळी आरोपीने पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून संबंधित नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे..

दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून महामार्गलगत असणाऱ्या एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुलाने हे शेजारी राहत आहेत. दोन वर्षीय मुलगी संबंधित मुलाकडे खेळायला जात असे. लहान मुलीची आई सकाळी कपडे धुत असताना मुलाने मुलीला त्याच्या खोलीत घेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या आईने बंद असलेल्या खोलीकडे धाव घेऊन दरवाजा प्रयत्न केला. पण, मुलाने दरवाजा उघडला नाही.

आरडाओरडा केल्यानंतर आरोपी मुलगा मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला होता. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे हलवली अन् आरोपी मुलाल अटक केली.  मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.